कोकणचा शिमगा म्हटलं की मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांना लाल मातीची ओढ आणि ग्रामदेवतेच्या पालखीची आस गावी बोलावत असते. मात्र गावी जाण्याचे वेध लागले की डोळ्यांसमोर उभी राहते ती रेल्वेची प्रचंड वेटिंग लिस्ट, एसटी बसमधील प्रचंड गर्दी आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांच्या न संपणाऱ्या रांगा. दरवर्षीचा हा प्रवासाचा ‘वनवास’ पार करत मजल-दरमजल करत कोकणवासी कसेबसे गावी पोहोचतात. पण यंदा मात्र या प्रवासातील अडथळ्यांच्या शिमग्याला पूर्णविराम मिळणार असून कोकणवासीयांचा खऱ्या अर्थाने आनंदाचा शिमगा साजरा होणार आहे.
advertisement
कोकणवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण
शिमग्याला. उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची दरवर्षी होणारी गैरसोय आणि हालअपेष्टा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकणवासीयांसाठी खास भेच जाहीर केली आहे. कोकण कन्या एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस या कोकणातील लोकप्रिय गाड्यांमध्ये अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे. या घोषणेमुळे मुंबईतील कोकणवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अतिरिक्त 3AC इकोनॉमी कोच कायमचा जोडण्याचा निर्णय
कोकणातात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेने 25 फेब्रुवारीपासून मुंबई मडगा कोकण कन्या एक्सप्रेस आणि मांडोवी एक्सप्रेसला या गाड्यांमध्ये एक अतिरिक्त 3AC इकोनॉमी कोच कायमचा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई सिकंरदाबाद दुरंतो एक्सप्रेस ही पूर्ण एसी करण्यात आली आहे.
कसं असणार आहे वेळापत्रक?
- 20111 सीएसएमटी-मडगांव कोंकण कन्या एक्सप्रेस - 25 फ्रेब्रुवारीपासून नवा कोच जोडण्यात येणार आहे.
- 20112 मडगांव-सीएसएमटी कोकण कन्या एक्सप्रेस - 24 फ्रेब्रुवारीपासून नवा कोच जोडण्यात येणार आहे.
- 10103 सीएसएमटी-मडगांव मांडवी एक्सप्रेस- 25 फ्रेब्रुवारीपासून नवा कोच जोडण्यात येणार आहे.
- 10104 मडगांव-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस - 25 फ्रेब्रुवारीपासून नवा कोच जोडण्यात येणार आहे.
