तिसरी विशेष गाडी
कोकण रेल्वेने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी ही गाडी (01134) सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वा. 25 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी (01133) 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी सुटून सावंतवाडीला ती त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता पोहोचणार आहे.
advertisement
AC मधील फुकट्यांना दणका, पश्चिम रेल्वेने वसूल केले 1175400000!
यापूर्वी 2 गाड्यांची घोषणा
प्रवाशांची वाढती गर्दी आणि आंगणेवाडीच्या दिशेनं जाणारा ओघ पाहता गर्दीचं विभाजन करण्यासाठी कोकण रेल्वेकडून यापूर्वीच 2 विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते सावंतवाडी रोड या स्थानकांदरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत.
21 फेब्रुवारी रोजी गाडी क्र. 01129 ही विशेष रेल्वे एलटीटीहून रात्री 12.55 वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड इथं ती दुपारी 12 वाजता पोहोचणार आहे. तर गाडी क्र. 01130 विशेष रेल्वे सावंतवाडी रोडहून 21 फेब्रुवारी - रोजी सायंकाळी 6 वाजता सुटून मुंबईत एलटीटीला सकाळी 6.10 वाजता पोहोचेल. 19 डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, बोरत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल.
Mumbai Local: वीकेंडला जंबो ब्लॉक! 13 तास लोकल नाही, पश्चिम रेल्वेची मोठी घोषणा
आंगणेवाडी यात्रेसाठी 22 फेब्रुवारी रोजी गाडी क्र. 01131 एलटीटी येथून रात्री 12.55 वाजता सुटणार असून, ती सावंतवाडी रोडला दुपारी 12 वाजता पोहोचेल. तर गाडी क्र. 01132 ही सावंतवाडी रोडवरून 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सुटणार असून ती एलटीटीला सकाळी 6.10 वाजता पोहोचेल. 22 डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे.
दरम्यान, आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा कॅलेंडर किंवा तिथीनुसार ठरत नाही. तर देवीला कौल लावून ठरवली जाते. त्यानुसार यंदा 22 फेब्रुवारी रोजी ही यात्रा ठरली आहे. त्यामुळे देश-विदेशातील चाकरमान्यांची पाऊले या काळात आंगणेवाडीकडे वळतात. दरवर्षी भराडी देवीच्या दर्शनासाठी सुमारे 5 ते 7 लाख भाविक येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने तयारी केली आहे.