Mumbai Local: वीकेंडला जंबो ब्लॉक! 13 तास लोकल नाही, पश्चिम रेल्वेची मोठी घोषणा

Last Updated:

Mumbai Local: वीकेंडला बाहेर पडण्याआधी मुंबईकरांना लोकलचं वेळापत्रक पाहावं लागणार आहे. पश्चिम रेल्वेनं जंबो मेगाब्लॉकची घोषणा केलीये.

Mumbai Local: वीकेंडला जंबो ब्लॉक! 13 तास लोकल नाही, पश्चिम रेल्वेची मोठी घोषणा
Mumbai Local: वीकेंडला जंबो ब्लॉक! 13 तास लोकल नाही, पश्चिम रेल्वेची मोठी घोषणा
मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वीकेंडला बाहेर जाण्याचा प्लॅन करणाऱ्या मुंबईकरांना लोकलचं वेळात्रक पाहूनच नियोजन करावं लागेल. पश्चिम रेल्वे 9 आणि 9 फेब्रुवारी रोजी जंबो मेगाब्लॉक घेणार आहे.  या काळात ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल दरम्यान रात्री 10.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंत अप आणि डाऊन दोन्हीमार्गांवरील सेवा 13 तासांसाठी बंद राहणार आहेत.
पश्चिम रेल्वेवरील जंबो ब्लॉकच्या काळात रेल्वे ट्रॅक, सिग्नल यंत्रणा आणइ ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे या 13 तासांच्या काळात चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान सर्व अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या निवेदनात दिली आहे.
advertisement
काही गाड्या रद्द
दरम्यान, पश्चिम रेल्वेवरील जंबो ब्लॉकच्याकाळात काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. तर काही चर्चगेट गाड्या या अंशत: बद राहतील किंवा बांद्रा/दादर स्टेशनवरून रिव्हर्स केल्या जातील. याबाबत स्टेशन मास्तरला सविस्तर माहिती दिल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेने वसूल केले 117.54 कोटी
पश्चिम रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेतली होती. तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने 117.54 कोटी रुपये वसूल केले आहेत. संपूर्ण मुंबईत नियमितपणे विना तिकीट प्रवाशांसाठी मोहीम राबविली जाते. जानेवारी 2025 मध्ये 2.24 लाख विनातिकीट आणि अनियमित प्रवासी आढळले. त्यांच्याकडून 13.08 कोटी रुपये वसूल केल्याचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: वीकेंडला जंबो ब्लॉक! 13 तास लोकल नाही, पश्चिम रेल्वेची मोठी घोषणा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement