Weather Report: घराबाहेर पडण्याआधी हे पाहा! राज्यात पारा चढला, मुंबईसाठी महत्त्वाचा अलर्ट

Last Updated:

Weather Update Today: राज्यातील बहुतांश शहरांमधील कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ झालीये. नागपुरात मात्र वेगळे चित्र असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

+
Weather

Weather Report: मुंबईकर काळजी घ्या! हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट, पुण्यात काय स्थिती?

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
पुणे: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. सध्या राज्यात सर्वत उन्हाची तीव्रता वाढली असून किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर विदर्भातील नागपुरात मात्र काही प्रमाणात तापमानात घट झालीये. त्यामुळे उकाड्यापासून नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. तर मुंबईचा पारा 35 अंशांच्या पारा गेला असून गेल्या काही वर्षांतील फेब्रुवारी महिन्यात यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद झालीये. पुढील 24 तासांत राज्यातील हवामान व तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
मुंबईमधील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झालीये. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. 8 फेब्रुवारीला मुंबईतील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मुंबईत मुख्यतः निरभ्र आकाश राहणार अशून काही दिवस तापमान स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
पुण्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 8 फेब्रुवारीला पुण्यामध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवसांत पुण्यातील किमान तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये निरभ्र आकाश असणार आहे. कमाल तापमान 34 अंश तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमानात देखील वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना उकाडा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
advertisement
नागपूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहील. नागपूर मधील तापमानात काहीशी घट झाल्याने नागपूरकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. 8 फेब्रुवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. तर पुढील काही दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचे कमाल तापमान 33 अंश तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके राहील. 8 फेब्रुवारीला नाशिक मध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवसांत नाशिकच्या किमान तापमानात 4 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Weather Report: घराबाहेर पडण्याआधी हे पाहा! राज्यात पारा चढला, मुंबईसाठी महत्त्वाचा अलर्ट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement