मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या बदलामुळे प्रवाशांचा संताप
मंगळूरु सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस 29 जानेवारीपर्यंत फक्त पनवेल स्थानकापर्यंतच धावणार आहे तसेच 31 जानेवारीपर्यंत ही गाडी पनवेलहूनच सुटणार आहे. या बदलामुळे कोकण आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक प्रवाशांना एलटीटीपर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त लोकल किंवा इतर वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.
advertisement
कोकण मार्गावरील गाड्यांबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम
दरम्यान दादर-रत्नागिरी पॅसेंजरप्रमाणेच इतर गाड्याही कायमस्वरूपी पनवेलपर्यंतच चालवल्या जाणार का अशी शंका आता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. कोरोनापूर्वी रत्नागिरी–दादर पॅसेंजर उशिरा धावू लागल्यानंतर ही गाडी दिवा स्थानकातच थांबवण्यात आली होती आणि तेथूनच परत पाठवली जात होती. कोरोनानंतर मात्र ही गाडी दादरपर्यंत न जाता कायमस्वरूपी रत्नागिरी-दिवा-रत्नागिरी अशीच धावत आहे.
यामुळे इतर कोकण मार्गावरील गाड्यांबाबतही रेल्वे प्रशासन हळूहळू पनवेलपर्यंतच सेवा मर्यादित ठेवण्याचा विचार करत असल्याची भीती कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुरुस्ती व देखभालीचे काम सुरू असून 30 जानेवारीपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे नेत्रावती एक्सप्रेस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
