गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे आणि रस्ते मार्गाने कोकणमध्ये प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढते. मात्र, एसटीचे विशेष नियोजन हे प्रवाशांच्या सोयीसाठी केलेले असते. एसटी सेवा थेट गावात, वाडी-वस्तीपर्यंत पोहोचते, त्यामुळे कोकणवासीय एसटीला पसंती देतात. तसेच, वैयक्तिक तिकीट बुकिंग तसेच गट बुकिंगसाठीही एसटीची सुविधा उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांना सोयीसाठी ही सुविधा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
advertisement
यावर्षी एसटीने विशेष सवलतीही जाहीर केल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी 100 टक्के सवलत तर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 टक्के सवलत देण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांच्या बुकिंगमध्ये मोठी वाढ दिसून आली.
ठाणे विभागातून सर्वाधिक बुकिंग झाले, जिथून एकूण 2,671 बसेस फुल्ल झाल्या. मुंबई विभागातून 1,810 बसेस बुक झाल्या, तर पालघर आणि रायगड विभागातून 622 बसेस भरल्या. उत्पन्नाच्या बाबतीतही ठाणे विभागाने अग्रणी भूमिका बजावली असून, ठाणे विभागातून एसटीला 7 कोटी 34 लाख रुपये उत्पन्न झाले. मुंबई विभागातून 4 कोटी 29 लाख रुपये तर पालघर व रायगड विभागातून 39 लाख रुपये उत्पन्न मिळाले.
गणेशोत्सवाच्या दीड दिवसांच्या विसर्जनानंतर टप्प्याटप्प्याने कोकणातून परतीचा प्रवास सुरू झाला आहे. एसटीने परतीच्या प्रवाशांसाठी देखील विशेष नियोजन केले असून, प्रवाशांच्या सोयीसाठी बसेस वेळापत्रकानुसार चालविल्या जात आहेत.
या योजनेमुळे एसटीला केवळ आर्थिक उत्पन्न मिळाल नाही तर कोकणवासीयांच्या विश्वास आणि पसंतीतही वाढ झाली आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या प्रवास सुविधांनी भाविकांना आकर्षित करण्याचे उद्दिष्ट महामंडळाचे आहे.