अनेक स्थानकांवर लोकल थांबणार नाही
मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक राहणार आहे. हा ब्लॉक सकाळी 10.55 वाजता सुरू होऊन दुपारी 3.55 वाजेपर्यंत असेल. या कालावधीत मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार या स्थानकांवर लोकल गाड्या थांबणार नाहीत. त्यामुळे या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
advertisement
ट्रान्स-हार्बर मार्गावरही प्रवासाचा खेळखंडोबा
तसेच ट्रान्स-हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते वाशी आणि नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत लोकल सेवा बंद राहणार आहे. या मार्गावरील काही लोकल सेवा रद्द किंवा उशिराने धावण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वेवर 153 लोकल रद्द
दरम्यान पश्चिम रेल्वेवरही ब्लॉकमुळे मोठा परिणाम होणार आहे. कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असून रविवारी एकूण 153 लोकल गाड्या रद्द राहतील. यामध्ये अप मार्गावरील 79 आणि डाऊन मार्गावरील 74 लोकल सेवांचा समावेश आहे. हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री 1 ते सकाळी 6.30 वाजेपर्यंत जलद मार्गावर तर अप धीम्या मार्गावर मध्यरात्री 1 ते पहाटे 4 वाजेपर्यंत असेल. प्रवाशांनी प्रवासापूर्वी लोकल वेळापत्रक तपासावे आणि आवश्यक असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
