TRENDING:

Mumbai : सकाळी 10.20 ची फास्ट ट्रेन; अंधेरीहून सुटताच असं काही घडलं की..., पोलिसांना करावा लागला तात्काळ हस्तक्षेप

Last Updated:

Fake UTS Pass Scam Exposed : पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणीदरम्यान एका महिलेकडे बनावट यूटीएस एसी लोकल पास आढळला. व्हॉट्सअॅप आणि एआयच्या मदतीने हा पास तयार करण्यात आल्याचे तपासात उघड झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बनावट डिजिटल तिकीट प्रकरण उघडकीस आणले आहे. मुंबई सेंट्रल येथे ट्युटीवर असलेल्या स्पोर्ट्स स्क्वॉडच्या सीटीआय स्मिता पी. दीपिका मूर्ती यांनी ही कारवाई केली. 9 जानेवारी रोजी सकाळी चर्चगेट-विरार मार्गावरील फास्ट लोकल ट्रेनमध्ये त्या ड्युटीवर होत्या.
News18
News18
advertisement

अंधेरी स्थानकातून निघताच पोलिसांना बोलवण्याची वेळ

सकाळी सुमारे 10:20 वाजता अंधेरी स्थानकावरून सुटलेल्या फास्ट लोकलच्या महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात तिकीट तपासणी सुरू असताना एका महिला प्रवाशाने मोबाईलवर यूटीएस एसी लोकल पास दाखवला. मात्र हा पास पाहताच तपासणी कर्मचाऱ्यांना संशय आला. पासवरील काही तपशील चुकीचे वाटत होते.

प्रवाशाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिला वांद्रे स्थानकावर उतरवण्यात आले. त्यानंतर डीसीटीआय कंट्रोलच्या मदतीने पासची पडताळणी करण्यात आली. तपासणीत हा पास पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले.

advertisement

कसा तयार केला बनावट पास...?

वांद्रे येथील तिकीट तपासणी कार्यालयात चौकशीदरम्यान संबंधित महिलेने कबुली दिली. तिने सांगितले की व्हॉट्सअॅपवरून मिळालेल्या आठ बनावट यूटीएस अॅप्सच्या मदतीने हा पास तयार करण्यात आला होता. या प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने महिलेला वांद्रे जीआरपी पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि पुढील कारवाई सुरू करण्यात आली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतात करा गार AC मध्ये काम, चक्क ट्रॅक्टरला बसवला एसी, किती आला खर्च? Video
सर्व पहा

दरम्यान काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारचे प्रकरण समोर आले होते. एसी लोकलमध्ये चार प्रवासी बनावट पाससह पकडले गेले होते. हे पास यूटीएस अॅपवर नव्हते तर मोबाईलमधील एका फोल्डरमध्ये फोटो स्वरूपात ठेवले होते. क्यूआर कोड नसणे आणि एकसारखे तिकीट क्रमांक असल्याने संशय बळावला. तपासणीनंतर हे पास एआयच्या मदतीने तयार करण्यात आल्याचे समोर आले होते.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : सकाळी 10.20 ची फास्ट ट्रेन; अंधेरीहून सुटताच असं काही घडलं की..., पोलिसांना करावा लागला तात्काळ हस्तक्षेप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल