गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाण्याआधी वाचा
सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार मंदिर बंद असण्याच्या काळात श्री गणेशाच्या मूर्तीवर सिंदूराचा लेप करण्यात येणार आहे. ही परंपरागत धार्मिक प्रक्रिया असल्यामुळे भाविकांना गाभाऱ्यातील मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही. मात्र मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी श्रींच्या छायाचित्राचे दर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ट्रस्टने भाविकांना आवाहन केले आहे की या कालावधीत दर्शनासाठी गर्दी टाळावी तसेच सहकार्य करावे. विशेष म्हणजे या पाच दिवसांत मंदिर परिसरात तुलनेने कमी गर्दी राहण्याची शक्यता असल्याचेही ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे.
advertisement
'या' दिवशी मंदिराचे दरवाजे बंद
मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार,7 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. सिंदूर लेपन विधी पूर्ण झाल्यानंतर 12 जानेवारी रोजी सकाळी विधीवत पूजा-अर्चा केली जाणार त्यानंतर दुपारी 1 वाजता मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात येईल. त्या दिवसापासून नेहमीप्रमाणे प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन सुरू होणार आहे.
