सुधारित दरपत्रकानुसार स्पीड पोस्ट सेवेत आता अधिक पारदर्शकता, सुरक्षा आणि ग्राहकांची सोय यावर भर दिला जात आहे. स्थानिक परिसराबाहेर देशात कुठेही 50 ग्रॅम पर्यंतच्या डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी मूळ दर 47 रुपये ठरवण्यात आला आहे.
OTP शिवाय डिलिव्हरी नाही
स्पीड पोस्ट सेवेत आता आणखी एक बदल लागू केलेला आहे तो म्हणजे प्रत्येक डिलिव्हरी ग्राहकाला ओटीपी पाठवूनच वितरण केले जाईल, ज्यामुळे टपाल सुरक्षित आणि खात्रीपूर्वक पोहचेल. तसेच ऑनलाईन पेमेंट, रिअल-टाइम वितरण अपडेट्स, एसएमएस-आधारित वितरण सूचना आणि ऑनलाईन बुकिंगची सुविधा दिली गेली आहे. यामुळे ग्राहकांना स्पीड पोस्ट वापरणे अधिक सोयीस्कर होईल. या सुधारित सुविधांचा उद्देश ग्राहकांचा विश्वास वाढवणे, वितरण प्रक्रिया जलद करणे आणि सेवा अधिक सुरक्षित बनवणे हा आहे.
advertisement
1 ऑक्टोबरपासून लागू होणारे स्थानिक पोस्ट दर
1)स्थानिक भागासाठी (Local Area)
50 ग्रॅमपर्यंत: 19 रुपये
51 ते 250 ग्रॅम: 24 रुपये
251 ते 500 ग्रॅम: 28 रुपये
2)200 किलोमीटरपर्यंत (Up to 200 km)
50 ग्रॅम: 47 रुपये
51 ते 250 ग्रॅम: 59 रुपये
251 ते 500 ग्रॅम: 70 रुपये
200 ते 500 किलोमीटर (200–500 km)
50 ग्रॅम: 47 रुपये
51 ते 250 ग्रॅम: 63 रुपये
251 ते 500 ग्रॅम: 75 रुपये
3)500 ते 1000 किलोमीटर (501–1000 km)
50 ग्रॅम: 47 रुपये
51 ते 250 ग्रॅम: 68 रुपये
251 ते 500 ग्रॅम: 82 रुपये
1001 ते 2000 किलोमीटर (1001–2000 km)
50 ग्रॅम: 47 रुपये
51 ते 250 ग्रॅम: 72 रुपये
251 ते 500 ग्रॅम: 86 रुपये
4)2000 किलोमीटरपेक्षा जास्त (Above 2000 km)
50 ग्रॅम: 47 रुपये
51 ते 250 ग्रॅम: 77 रुपये
51 ते 500 ग्रॅम: 93 रुपये
केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्स एका पोस्टमध्ये सांगितले की, 1 ऑक्टोबर 2025 पासून स्पीड पोस्ट सेवेत ओटीपी-आधारित वितरण, पर्यायी नोंदणी आणि जीएसटी स्वतंत्र दाखविण्यासह पारदर्शक दर लागू होतील. इंडिया पोस्ट प्रत्येक घरापर्यंत जलद आणि खात्रीपूर्वक टपाल पोहोचवेल. 167 वर्षांच्या समृद्ध परंपरेनुसार सेवा सुधारित करून नागरिकांना अधिक प्रभावीपणे जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही प्रगती आमच्या टपाल खात्याच्या सेवेत विश्वास, सुरक्षितता आणि आधुनिकतेची साक्ष आहे.
या सुधारित दर आणि सुविधांमुळे स्पीड पोस्ट सेवेला आता अधिक विश्वासार्ह, जलद, सुरक्षित आणि ग्राहकाभिमुख बनवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या टपाल व्यवहारांसाठी अधिक सोयीस्कर अनुभव मिळेल आणि भारतातील टपाल सेवा आधुनिक तंत्रज्ञानासह एक पायरी पुढे जाईल.