मुंबई - मुंबईच्या मालाडमध्ये घडलेल्या एका घटनेने सर्वांना हादरुन सोडले आहे. जिथे मालाडमध्ये एका परिसरात बसण्याच्या अतिशय शुल्लक कारणांमुळे एका तरुणाने दोन वृद्धांना जोरदार मारहाण केलेली आहे. या घटनेते दोघ वृद्धांना गंभीर जखमा झालेल्या असून पोलिसांना तरुणाला अटक केलेली आहे.
advertisement
नेमके घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार,रविवार संध्याकाळी सातच्या सुमारास बहरजी बलीहारी कनोजिया (66) आणि त्यांचा मित्र राजनाथ यादव (67) त्यांच्या सोसायटीजवळील बाकावर बसले होते. दरम्यान त्यांच्या परिसरातील एक तरुण त्याच्या जवळ आला आणि त्याने त्यांना इकडे बसण्यास नाही सांगितले. या शुल्लक गोष्टीवरुन वाद वाढत गेला आणि त्यात रागाच्या भरात तरुणाने दोघांना मारहाण केली.
घडलेल्या घटनेनंतर तरुणाने घटनास्थळावरुन पळ काढला. पण त्या वृद्ध व्यक्तींनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर तरुणाचा तपास सुरु करुन त्याला अटकही करण्यात आली. हल्ल्यात जखमी झालेले बहरजी आणि राजनाथ दोघेही सध्या उपचार घेत आहेत. पोलीसांनी हत्येचा प्रयत्न, शारिरिक हानी पोहोचवणे आणि इतर संबंधित कलमांतर्गत तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
