TRENDING:

Health Tips : डिप्रेशनच्या गोळ्या घेताय? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, आधी हे वाचा

Last Updated:

अनेकजण डिप्रेशन कमी करण्यासाठी औषधे घेत आहेत. मात्र, ही औषधे हृदयासाठी किती धोकादायक ठरू शकतात, हे अनेकांना माहिती नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : आजकाल अनेक लोक डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा सामना करत आहेत. ऑफिसमधील कामाचा ताण, घरगुती समस्या, एकटेपणा यामुळे मानसिक तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकजण डिप्रेशन कमी करण्यासाठी औषधे घेत आहेत. मात्र, ही औषधे हृदयासाठी किती धोकादायक ठरू शकतात, हे अनेकांना माहिती नाही. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.
advertisement

डिप्रेशनच्या औषधांचा वापर फक्त वैद्यकीय देखरेखीखाली करणे गरजेचे आहे. स्वयंपूर्णपणे औषधे घेणे किंवा डोसमध्ये बदल करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. मानसिक आजार हे लज्जास्पद नसून उपचारक्षम आहेत, हे समाजाने समजून घेणे आवश्यक आहे. औषधांबरोबरच काउन्सेलिंग, योग, ध्यान, नियमित झोप, व्यायाम आणि समतोल आहार या गोष्टींचाही उपचारात मोठा फायदा होतो.

मुलं केळी आणि ड्रायफ्रूट खाण्यास कंटाळा करतात? 5 मिनिटांत बनवा हेल्दी शेक Video

advertisement

डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले की, या औषधांच्या दीर्घकालीन वापरामुळे काही दुष्परिणामही दिसून येतात. काही रुग्णांना झोप न लागणे, वजन वाढणे, पचन बिघडणे, लैंगिक इच्छेत घट, चिडचिड, हात थरथरणे किंवा भावनिक संवेदनांचा अभाव जाणवतो. औषधे अचानक बंद केल्यास विथड्रॉवल सिंड्रोम म्हणून ओळखला जाणारा ताण, चिंता, थकवा आणि नैराश्याचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये शरीराच्या अवयवांवरही दीर्घकाळ परिणाम दिसून येतात, विशेषतः यकृत आणि मूत्रपिंडावर मोठे दुष्परिणाम होतात.

advertisement

काय दुष्परिणाम होऊ शकतात...

औषधांमुळे वजन वाढणे, हृदयाचे ठोके बदलणे, झोपेच्या समस्या किंवा इतर शारीरिक दुष्परिणाम होऊ शकतात. व्यक्तीनुसार बदल प्रत्येक व्यक्तीवर औषधांचा परिणाम वेगळा असतो. काही औषधे प्रभावी नसतील तर काहींचे दुष्परिणाम जास्त जाणवतात. दीर्घकालीन वापर दीर्घकाळ औषधे घेतल्यास त्यांचे परिणाम आणि दुष्परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे.

काय काळजी घ्यावी

advertisement

डॉक्टरांचा सल्ला घ्या: औषधोपचार सुरू करण्यापूर्वी किंवा बंद करण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉक्टरांना माहिती द्या: तुम्हाला जाणवणारे दुष्परिणाम डॉक्टरांना त्वरित सांगावे, जेणेकरून ते औषध बदलू शकतील.

उपचारांशी जोडून रहा: उपचारांच्या प्रक्रियेत संयम ठेवावा लागतो आणि डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करावे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
घरात भाऊ-बहिणीची जोडी खास, एकाच वेळी केली CA परिक्षा पास, Video
सर्व पहा

पूर्ण उपचार घ्या: काहीवेळा लक्षणे सुधारण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो, पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे बंद करू नका.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : डिप्रेशनच्या गोळ्या घेताय? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, आधी हे वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल