सध्या लोअर परेलमधील एका गॅस एजन्सी बाहेरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ANI या वृत्त संस्थेने त्यांच्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. अनेक नागरिक घरातील रिकामा एलपीजी गॅस सिलिंडर घेऊन लांबच लांब रांगेत उभे आहेत. मुख्यमंत्री, मंत्री या सर्वांकडून गॅस सिलिंडरचा सुरळीत पुरवठा होत असल्याचा दावा करण्यात येत असतानाही नागरिकांना सिलिंडर मिळत नाही. त्यामुळे नागरिक भर उन्हात गॅससाठी रांगेमध्ये उभे आहेत. घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई दिवसेंदिवस अधिकाधिकच वाढत असताना आता मुंबईकरांचा जीव अगदीच मेटाकुटीला आला आहे. सिलिंडरसाठी सकाळपासूनच मुंबईकर रांगेमध्ये उभे आहेत.
advertisement
मुंबईसह अनेक शहरांमध्ये नागरिकांकडून गॅस सिलिंडरसाठी गॅस एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावल्या जात आहेत. मुंबईतील अनेक भागांमध्ये, गॅस एजन्सीसमोरच नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. काही ठिकाणी नागरिकांचा एजन्सी मालकासोबत वाद झाल्यामुळे लगेचच पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. गोरेगाव आणि कांदिवलीमध्येही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. यामुळे नागरिकांना घरगुती गॅससाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक त्रास रांगेत उभे राहिल्यानंतरही अनेकांना सिलिंडर मिळतोय. तर काहींना तो सुद्धा नाही.
अनेक नागरिकांचा असा विश्वास आहे की, आपली नंबर येण्यापूर्वीच जर सिलिंडर संपून गेला तर? या भीतीने लोकांमध्ये निर्माण झालेल्या भितीमुळे ही नागरिकांची मोठ्याप्रमाणावर गर्दी आहे. आपल्या गरजेसाठी, एक सिलिंडर मिळेल या आशेने अनेकांनी लवकर येऊन तासनतास रांगेत थांबणे पसंत केले. तर काहींनी एक सिलिंडर मिळवण्यासाठी कामावरून सुट्टीही घेतली.
