मुंबई : सध्या सर्वत्र लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. गणेशोत्सव म्हटला की सर्वत्र गणपतीची मूर्ती ही शाडूची, मातीची किंवा इको फ्रेंडली बनवली जाते. मात्र, एका महिलेने चक्क खव्याच्या मिठाईपासून गणपतीची मूर्ती तयार केली आहे. तसेच या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापासून ते विसर्जनापर्यंत एक अनोखा प्रयत्न करून इष्ट देवतांच्या महाप्रसादाचा लाभ या विसर्जनातून कसा घेता येतो, याची संकल्पना कशी मांडली. याचबाबत लोकल18 चा आढावा.
advertisement
मुंबईसारख्या शहरात गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने भाविक गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणून त्यांची मनोभावाने पूजा करतात. मुंबईतील रेखा काळे यांनी गणेशोत्सव साजरा करत असताना एक अनोखी संकल्पना मांडली आहे. त्यानी गणपती बनविण्यापासून ते विसर्जनापर्यंत त्याचा प्रसादाचा लाभ कसा घेता येईल, याबाबत माहिती दिली.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, मागील 8 वर्षांपासून मी अशा प्रकारचा गणपती बनवते आहे. इको फ्रेंडली गणपती या विषयावर चर्चा निघाली आणि आपण जर का खव्याचा किंवा गूळ हळदीचा किंवा पेढ्याचा असा गणपती बनवला आणि नंतर त्याच दुधामध्ये विसर्जन केलं मग त्याची खीर बनवून सगळ्यांना दिली तर, असे बोलता बोलता सहज माझ्या तोंडातून निघून गेलं. तसेच गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी आपण जी त्याच्यामध्ये श्री गणेशाची ऊर्जा बोलावत असतो ती विसर्जन करून मातीत घालवण्याऐवजी मूर्ती रुपी गणपतीच्या प्रसादाद्वारे ती ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेतली तर नकळत होणारा श्री गणेशाचा अपमान पण थांबेल आणि शिवाय श्री गणेशाच्या ऊर्जेने आणि त्याच्या आशीर्वादाने आपलेही कल्याण होईल, असा विचार मांडला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कारगिल युद्धाचा देखावा, पुण्यात कुठे पाहता येणार, हे आहे लोकेशन, VIDEO
त्यानंतर मग आपल्याकडून आपल्या लाडक्या बाप्पाची नकळत होणारी विटंबना थांबवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे या बाप्पाला खाण्याच्या पदार्थांपासूनच बनवावे आणि त्याच्यानंतर त्याचे दुधात विसर्जन करून तो प्रसाद स्वतः ग्रहण करावा आणि आपल्या प्रियजनांना द्यावा म्हणजे त्या बाप्पाची ऊर्जा आणि त्या बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्यामध्ये पूर्णपणे सामावून जाईल आणि हे नेहमी करत आलो, तर तो बाप्पा आपल्यावर खऱ्या अर्थाने प्रसन्न होईल. त्यामुळे जेव्हा आपण विसर्जन आणि त्यानंतरच गणेशमूर्तींचे झालेले जे काही होतं ते पाहतो, तेव्हा मग खिन्न होतं.
मग कुठेतरी आपणच आपल्या आराध्याचा अपमान तर करत नाही ना, अशी शंका येते. म्हणूनच मी ही कल्पना सहज बोलून दाखवली आणि गेली 8 वर्षे माझ्याबरोबरच माझे सुमारे 25-30 विद्यार्थी ही कल्पना नियमितपणाने राबवत आहेत आणि त्यांनाही त्याच्या खूप फायदा झाला आहे.
सोलापुरात फुलले तब्बल 1008 पाकळ्यांचे दुर्मिळ सहस्त्र कमळ, काय आहे यात विशेष, VIDEO
खव्याच्या गणपती बनविण्याची पद्धत -
खव्याचा गणपती बनवायचा. वेलचीच्या दाण्यांचे डोळे बनवायचे. बासमती तांदुळाचे दात बनवायचे आणि कधी गुलाबाच्या पाकळीचा तर कधी केशरांच्या काड्यांचा मुकुट बनवायचा. मग या बाप्पाची तांदूळ आणि वर प्रतिष्ठापना करायची. नेहमी जसे गणपतीचे पूजन करतो तशीच पूजा करायची, असेही त्यांनी सांगितले.
गणपतीचा किंवा कोणत्याही पूजेचा महाप्रसाद हा घेण्यासाठी सगळे लोक उत्सुक असतात कारण त्या महाप्रसादात त्या इष्ट देवतेची ऊर्जा सामावलेली असते, असा एक समज असतो. हा महाप्रसाद त्या इष्टदेवतेला देऊन नंतर सगळ्यांना वाटला जातो, अशी माहिती त्यांनी दिली.