TRENDING:

निवडणुकीत अपक्ष, बंडखोरांचं भवितव्य काय! 2024 ची पुनारावृत्ती 2026 मध्ये होणार? जाणून घ्या मतांच्या टक्केवारीचं समीकरण

Last Updated:

महापालिका निवडणुकीत अपक्ष आणि बंडखोरांचा बोलबाला दिसतोय. पण प्रश्न आहे प्रस्थापीतांच्या पुढे अपक्ष आणि बंडखोर तग धरू शकतील का? असा सवाल उपस्थित होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 10 वर्षांनी होत आहेत त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळाली आहे. या भाऊगर्दीने कधी नव्हे ते महापालिका निवडणुकीत अपक्ष आणि बंडखोरांचा बोलबाला दिसतोय. पण प्रश्न आहे प्रस्थापीतांच्या पुढे अपक्ष आणि बंडखोर तग धरू शकतील का?. कारण 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी केलेलं मतदान अपक्ष उमेदवारांच्या चिंता वाढवणारं आहे
News18
News18
advertisement

महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला. एबी फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कारचा पाठलाग केला. मंत्र्यांना खडेबोल सुनावले, तर पक्षानं तिकीट नाकारल्यानंतर काहींनी कपडे फाडले. अनेकांना त्यांचे अश्रू रोखता आले नाही. परिणामी राजकीय पक्षांकडून तिकीट मिळालं नाही म्हणून अनेकांनी बंडखोरी केलीय. अनेकांनी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

advertisement

महापालिका निवडणुकीत हजारो अपक्ष आणि बंडखोर मैदानात

राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 893 वॉर्ड असून 2,869 जागा आहेत. तर 33,606 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. त्यामुळे त्यातील किती जण जिंकतील, असा प्रश्न निर्माण झालाय. महापालिका निवडणुकीत हजारो अपक्ष आणि बंडखोर मैदानात आहेत. मात्र त्यांचा विजयाचा मार्ग सोपा नाही. कारण 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्षांची धुळधाण उडाली होती. 288 विधानसभा मतदारसंघात सर्व अपक्षांना एकूण 19,92,817 मतं मिळाली होती. टक्केवारीत ते प्रमाण अवघं 3.7 टक्के इतकं होतं. फक्त दोनच अपक्ष उमेदवार जिंकले होते. चंदगडमधून शिवाजी पाटील आणि जुन्नरमधून शरद सोनवणे हेच दोन अपक्ष विजयी झाले होते.

advertisement

2024 ला नेमकं काय झालं होतं?

याचाच अर्थ मतदारांनी त्या निवडणुकीत अपक्षांना नाकारलं होतं. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत मतदार कशा पद्धतीनं मतदान करतात, हे महत्त्वाचं असणार आहे. निवडणुकीच्या मैदानात अपक्ष आणि बंडखोर विजयाचा संकल्प करून उतरले आहेत. आता मतदार त्यांचा संकल्प तडीस नेतात की नाही, हे 16 जानेवारीला स्पष्ट होईल.

advertisement

निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार

मतदानापूर्वीच काही जागांवरील निकालाचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. अर्जांच्या छाननीत अनेक राजकीय पक्षांना धक्के बसत आहेत. राज्यात भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे कल्याण-डोंबिवली 21, जळगावात 12, भिवंडीत तब्बल 7 नगरसेवक विजयी झाले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार असून त्यापाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत.  राष्ट्वादी अजित पवारांच्या पक्षाचे देखील दोन उमेदवार विजयी झाले आहेत.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अमरावतीमधील प्रसिद्ध दहीवडेवाले, 80 वर्ष खवय्यांच्या जिभेची जपलीये चव, Video
सर्व पहा

निवडणुकीआधी महायुतीची हाफ सेंच्युरी; कुठे, कुणाचे किती बिनविरोध नगरसेवक? वाचा राज्याची संपूर्ण यादी

मराठी बातम्या/मुंबई/
निवडणुकीत अपक्ष, बंडखोरांचं भवितव्य काय! 2024 ची पुनारावृत्ती 2026 मध्ये होणार? जाणून घ्या मतांच्या टक्केवारीचं समीकरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल