नागपूरमध्ये जोरदार पाऊस
नागपूर जिल्हा आणि शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. नागपुरात रात्री दोन वाजेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज सकाळीच जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी शहरातील अनेक भागांची पाहणी केली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाला सर्तकतेच्या सूचनाला देण्यात आल्या आहेत. एवढच नाही तर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सर्व जिल्हा आणि महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
advertisement
मराठवाड्यात पावसाची हजेरी
विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळापासूनच मराठवाड्यातील ग्रामीण भागात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.
दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातही प्रदीर्घ विश्रांतीनंर पावसाचं आगमन झालं आहे. कालपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीप्रमाणात का होत नाही दिलासा मिळाला आहे.