लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टर महायुतीला जड गेला. भाजपला मराठवाड्यात मिळालेल्या मतदानाची टक्केवारी केवळ 29 टक्के राहिली. पक्षानं मराठवाड्यातील सगळ्या जागा गमावल्या. महायुतीला मराठवाड्यात केवळ एक जागा जिंकता आली. त्यानंतर आता मुंबईच्यया निवडणुकीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मुंबई महानगपालिकेसाठी मनोज जरांगे यांनी ठाकरे बंधूना पाठींबा दिला आहे. मुंबईचे अस्तित्व राखण्यासाठी मुंबई ठाकरेंच्या हातात शोभून दिसणार, असे म्हणत ठाकरे बंधूंना जाहीर पाठींबा दिला आहे.
advertisement
जरांगेचं ठाकरेंना पाठींबा देणारे परिपत्रक
मनोज जरांगे यांनी ठाकरेंना पाठींबा देणारे एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात मनोज जरांगेंनी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि कोकणातील मराठा बांधवांना आवाहन केले आहे. मुंबईसाठी 107 हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाला स्मरुन ठणकावून सांगू इच्छितो की, मुंबई आमची आहे. मराठी माणसांची आहे. महाराष्ट्राने विकत घेतलेली आहे, असे मनोज जरांगे म्हटले आहे. आपल्याला मुंबई काबीज करायची आहे, घाबरू नका असे मनोज जरांगे म्हणाले आहे.
मनोज जरांगे यांनी काय आवाहन केले?
मराठ्यांनो, मुंबई आझाद मैदानातील आंदोलन विसरलात तर नाही ना...? आपल्याला दिलेली जुलमी वागणूक, पाणी बंद, दुकाने बंद, टॉयलेट व्यवस्था नाही आणि आंदोलनासाठी दिलेली तुटपुंजी जागा, आपले झालेले हाल लक्षात आहे ना..? आता बारी आपली... परतफेड करण्याची... लढाई शेवटची ... मराठी अस्मितेची... मुंबई वाचवण्याची... संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनता या लढाईत उतरली आहे आणि आपणही... मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आखला आहे. मुंबा-आई आपल्या पासून हिरावून घेण्याचे षडयंत्र रचले आहे. हा डाव उलथवून टाकण्यासाठी मुंबईतील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि कोकणातील मराठा बांधवांनी ठाकरे बंधूंसोबच ठामपणे उभे राहा....
