मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर महापौरपदाची निवड रखडली होती. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आज सोमवारपासून राज्यभरात घडामोडींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी ६ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर ११ फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी मतदान होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
advertisement
त्यामुळे प्रॉमेस डे च्या दिवशी म्हणजेच, ११ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेत महापौर बसणार आहे. ३ फेब्रुवारी रोजी महापौरपद निवडणुकीची जाहिरात काढली जाणार आहे. त्यानुसार, लवकरच अर्ज दाखल केले जातील. महापौरपदाची निवड झाल्यानंतर १८ फेब्रुवारीला विशेष सभा आयोजित केली जाईल, याच तारखेला आधी शिक्षण समिती अध्यक्ष आणि त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष निवड होईल. तर या महिन्याच्या अखेर महापालिका आयुक्त फेब्रुवारी अखेरपर्यंत स्थायी समिती अध्यक्षांकडे अर्थ संकल्प सादर करतील. आणि त्यावर सभागृहात चर्चा केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
महापौरपदासाठी कुणाचं नाव चर्चेत
महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित आकडेवारीवर संचालन समितीत अलीकडेच बैठक पार पडली. महापौर पदासंदर्भात मुंबईच्या संचालन समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप नेत्यांची मतं जाणून घेतली होती. महापौर पदासंदर्भात राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शितल गंभीर, योगिता कोळी यांची नाव आघाडीवर आहे. तसंच, स्थायी समिती अध्यक्ष तसंच सभागृह नेत्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील बैठकीनंतरच सर्व पदांबाबत निर्णय होणार आहे.
