अखेर 'या' मेट्रो मार्गिकाचा मार्ग मोकळा
गेल्या काही महिन्यांपासून महापालिका निवडणुका संपल्यानंतर मेट्रो 2B आणि मेट्रो 9 सुरू करण्यात येतील असं सांगण्यात येत होतं. मंडाळे ते डायमंड गार्डन जोडणारी मेट्रो 2B आणि दहिसर ते काशिगाव जोडणारी मेट्रो 9 या मार्गिकांचं उद्घाटन डिसेंबरमध्ये होणार होतं. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आलं. आता निवडणुका पार पडल्यामुळे या मेट्रो मार्गिकांच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
advertisement
मेट्रो 9 च्या दहिसर ते सुभाष चंद्र बोस स्टेडियम या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. हा 4.4 किमी लांबीचा टप्पा 26 जानेवारी रोजी प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. डिसेंबरमध्ये या मार्गिकेची चाचणी घेण्यात आली होती. चाचणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी दूर करण्यात आल्याचं MMRDA कडून सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप सुरक्षा प्रमाणपत्र मिळालेलं नाही. येत्या आठवड्यात हे प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे.
मेट्रो 9 कशी असेल?
मेट्रो 9 ची एकूण लांबी 13.5 किमी असून सुरुवातीला फक्त एक टप्पा सुरू केला जाणार आहे. या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशिगाव अशी चार स्थानकं असतील. मेट्रो 9 आणि मेट्रो 7A सुरू झाल्यानंतर विमानतळाच्या टर्मिनल 2 पासून थेट मिरा-भाईंदरपर्यंत अखंड मेट्रो प्रवास शक्य होणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक सोयीचा होणार आहे
