ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत
या ई-लिलावासाठी इच्छुक अर्जदारांना ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी आता दि 2 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत संपणार होती मात्र नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि अर्जदारांची मागणी लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी दि. 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत ऑनलाइन ई-लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. हा लिलाव पूर्णपणे ऑनलाईन पार पडणार असून इच्छुकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सहभाग नोंदवायचा आहे.
advertisement
ऑनलाइन लिलावासाठी अधिकृत वेबसाईट जाहीर
हा ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर होणार आहे. मुंबईतील विविध ठिकाणी असलेल्या या गाळ्यांमध्ये दुकाने, कार्यालये तसेच इतर व्यावसायिक वापरासाठी उपयुक्त जागांचा समावेश आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजक आणि गुंतवणूकदारांकडून या ई-लिलावाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी इच्छुकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
