TRENDING:

MHADA Lottery : जे आधी येणार त्याला हक्काचं घर मिळणार ! मुंबईत म्हाडाच्या 118 घरांची होणार विक्री, कधी आणि कशी?

Last Updated:

म्हाडाने मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने शहरातील विविध भागांतील 118 सदनिकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर विक्री प्रक्रिया सुरू केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : म्हाडाने मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने शहरातील विविध भागांतील 118 सदनिकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर विक्री प्रक्रिया सुरू केली आहे. बुधवारी सकाळी 11 पासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत अनामत रक्कमेसह अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अनामत रक्कमेसह अर्ज भरल्यानंतर 48 तासांच्या आत अर्जदाराने घराच्या विक्री किमतीच्या 10 टक्के रक्कम भरणे बंधनकारक आहे. अन्यथा घरावरील दावा संपुष्टात येणार असून अदा केलेली अनामत रक्कम जप्त होणार आहे. ही रक्कम 1 ते 6 लाखांपर्यंत असल्याने अर्जदारांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. त्यामुळे इच्छुकांनी विचारपूर्वक आणि 10 टक्के रकमेची तरतूद असेल तरच अनामत रक्कमेसह अर्ज भरणे आवश्यक आहे.
MHADA Lottery: घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर! म्हाडाच्या 2000 हून अधिक घरांची सोडत; कधी आणि कोणत्या भागांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार?
MHADA Lottery: घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर! म्हाडाच्या 2000 हून अधिक घरांची सोडत; कधी आणि कोणत्या भागांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार?
advertisement

सध्याच्या घडीला पाहिला गेले तर मुंबईतील महागडी घरे विकली जात नाहीत. त्यामुळे मध्यम आणि उच्च गटातील घरे मोठ्या संख्येने रिक्त राहिली आहेत. तर अल्प गटातील काही घरे योग्य ठिकाणी नसल्याने रिक्त आहेत. त्यामुळेदोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही ही घरे विकली गेलेली नाहीत. त्यामुळे परिणामी, मुंबई मंडळाचा महसूल अडकून राहिला आहे. त्यामुळे मंडळाने प्रथमच मुंबईतील 118 घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध करून इच्छुकांच्या नोंदणीस सुरुवात करण्यात आली. नोंदणी पुढेही सुरू राहणार असून, आता बुधवारी सकाळी 11 पासून अनामत रक्कमेसह अर्ज भरण्याच्या, म्हणजेच घर खरेदी प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.

advertisement

गोरेगाव ते सीएसएमटी प्रवास होणार ‘गारेगार’, लवकरचं सुरू होणार AC लोकल, असा आहे प्लॅन

नोंदणीधारकांना आपल्या पसंतीचे घर निवडावे लागेल आणि त्यानंतर अनामत रक्कम भरावी लागेल. 50 लाखांपर्यंतच्या घरांसाठी एक लाख रुपये, 50 लाख ते एक कोटीपर्यंतच्या घरांसाठी दोन लाख रुपये, एक ते दोन कोटीपर्यंतच्या घरांसाठी चार लाख रुपये आणि दोन कोटींपुढील घरांसाठी सहा लाख रुपये अशी अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवगा तर तेजीतच, आल्याला आणि लिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

अर्जदार बुधवारपासून अनामत रक्कम भरतील, त्यांना अर्ज सादर केल्यापासून पुढील 48 तासांत घराच्या विक्री किमतीच्या 10 टक्के रक्कम अदा करावी लागणार आहे. अन्यथा घरावरील दावा संपुष्टात येईल आणि अनामत रक्कम जप्त केली जाईल, असा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यामुळे एक ते सहा लाख रुपये गमवावे लागू शकतात. अर्जदारांनी विचारपूर्वक अर्ज सादर करावा आणि 10 टक्के रकमेची तजवीज असेल तरच अनामत रक्कम भरावी, असे आवाहन मुंबई मंडळाने केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Lottery : जे आधी येणार त्याला हक्काचं घर मिळणार ! मुंबईत म्हाडाच्या 118 घरांची होणार विक्री, कधी आणि कशी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल