याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी 17 वर्षांची आहे. ती मुंबईतील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. करोनाकाळात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता, तर आईने जानेवारीत आत्महत्या केली होती. त्यामुळे पीडित मुलगी व तिचे दोन भाऊ अनाथ आश्रमात राहात होते. दरम्यान, मीरा रोड येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने पीडित मुलगी आणि तिच्या दोन लहान भावांना दत्तक घेतले होते.
advertisement
भाजपची नेता सना खानने पतीला दिले होते 50 लाख, पैसे परत मागताच केला खून
दत्तक घेतलेल्या कुटुंबातील 19 वर्षीय आरोपीने 8 ऑगस्टला पीडिता घरात झोपली असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पीडितीने शेवटी मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तिघांविरोधात बलात्कारप्रकरणी कलम ३७६, ३७६ (२) (एन) २९८, ५०६, ३४ सह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा (पोक्सो) कलम ४ आणि ८ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यातील १९ वर्षीय आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली.