भाजपची नेता सना खानने पतीला दिले होते 50 लाख, पैसे परत मागताच केला खून

Last Updated:

सनाने हे पैसे परत मागितले तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. यानंतर आरोपीने खून केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी करत आहेत.

News18
News18
नागपूर, 12 ऑगस्ट : भाजपच्या नागपूरमधील नेत्या सना खान हिच्या खून प्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. तिचा पती अमित साहूनेच तिची हत्या करून मृतदेह हिरन नदीत फेकून दिला होता. पोलीस आता मृतदेहाचा शोध घेत आहेत. दरम्यान, अमितने पत्नी सना खानची हत्या ही पैशांच्या व्यवहारातून केली असल्याचं समोर येतंय. अमित साहूने पत्नीकडून ५० लाख रुपये इतकी रक्कम पार्टनरशिपसाठी घेतली होती. सनाने हे पैसे परत मागितले तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. यानंतर आरोपीने खून केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी करत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, अमितने खूनप्रकरणी अनेक खुलासे केले आहेत. त्याने आपला गुन्हाही मान्य केला आहे. २ ऑगस्टला सनाची हत्या केली. तिला लोखंडी रॉडने मारत खून केला. त्यानंतर अमितने बेलखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुलावरून हिरन नदीत मृतदेह फेकून दिला. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेलं. अद्याप मतदेहाचा शोध लागलेला नाही.
advertisement
सना २ ऑगस्टला नागपूरहून जबलपूरला आली होती. तिथे येताच ती अमितच्या घरी गेली. दोघांमध्ये ५० लाख रुपयांबाबत बोलणं सुरू झालं. त्यावेळी त्यांच्यात वाद रंगला. दोन तास दोघांमध्ये हा वाद सुरू होता. यावर सनाने रागाच्या भरात अमितला अपशब्दांत सुनावले. यानंतर अमितने रागाने लोखंडी रॉड सनाच्या डोक्यात मारला. तिचा खून केल्यानंतर अमितने त्याच्या मित्राला फोन करून बोलावून घेतलं. दोघांनी सनाचा मृतदेह नदीच्या पाण्यात फेकून दिला.
advertisement
खून झाल्यानंतर जेव्हा सनाच्या आईने ती बेपत्ता असल्याची तक्रार नागपूर पोलिसात केली तेव्हा याचा खुलासा झाला. नागपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत करत जबलपूरला पोहोचले. त्यानंतर तिचा खून झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांना एक सीसीटीव्ही फूटेजही मिळाले असून त्यात सना खान दिसत आहे.
मराठी बातम्या/नागपूर/
भाजपची नेता सना खानने पतीला दिले होते 50 लाख, पैसे परत मागताच केला खून
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement