Cricket: चेंडू पकडण्यासाठी विकेटकिपरची धडपड, कसंबसं केलं आऊट; VIDEO VIRAL
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
एका विकेटकीपरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेंडू पकडण्यासाठी करावी लागलेली धडपड आणि त्यानंतर फलंदाजाला बाद केल्याचं या व्हिडीओत दिसतं.
दिल्ली, 12 ऑगस्ट : इंग्लंडमध्ये द हंड्रेड टुर्नामेंट सुरू आहे. यामध्ये यात फलंदाज आणि गोलंदाज दोघेही धमाल करताना दिसतायत. दरम्यान, याच स्पर्धेतील एका विकेटकीपरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेंडू पकडण्यासाठी करावी लागलेली धडपड आणि त्यानंतर फलंदाजाला बाद केल्याचं या व्हिडीओत दिसतं.
वुमन्स हंड्रेडमध्ये शुक्रवारी नॉर्दन सुपरचार्जर्स आणि ओवल इनविंसिबल्स यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात सुपरचार्जर्सने १४ धावांनी विजय मिळवला. यात सुपरचार्जर्सची विकेटकिपर बेस हिथ हिला एका फलंदाजाला बाद करताना बरीच धडपड करावी लागली. त्यावेळी मैदानातील खेळाडूंना हसू आवरलं नाही.
Hilarious stuff pic.twitter.com/UqMcS4pLTI
— Melissa Story (@melissagstory) August 11, 2023
advertisement
ओवलच्या डावातील पाचवं षटक जॉर्जिया वेअरहॅमने टाकलं. त्यावेळी स्ट्राइकला एलिस कॅप्सी होती. वेअरहॅमच्या पहिल्या चेंडूवर कॅप्सीने चौकार मारला. पण पुढच्या तीन चेंडूवर कॅप्सी फटका मारू शकली नाही. त्यानंतर पाचव्या चेंडूवर कॅप्सी पुढे य़ेऊन खेळण्याचा प्रयत्न करत होती. पण चेंडु हुकला आणि थेट विकेटकिपर हेथच्या हातात गेला. तेव्हा तिलाही चेंडू पटकन पकडता आला नाही. ग्लोव्हजमधून चेंडू निसटून खाली पडला.
advertisement
हीथने चेंडू दोन वेळा पकडण्याचा प्रयत्न केला पण तिला सहजपणे पकडता आला नाही. तिसऱ्या वेळी तिने चेंडू पकडला आणि कसं बसं कॅप्सीला बाद केलं. कॅप्सी क्रीजमधून पुढे गेली होती. बेस हीथ चेंडू पकडण्यासाठी करत असलेली धडपड तिने पाहिली. क्रीजमध्ये परत जाण्यासाठी मागे वळेपर्यंत हीथने स्टम्प उडवल्या होत्या. मात्र ही काही क्षणांची धडपड आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2023 2:33 PM IST