Mira Bhaynder Municipal Election 2026 : दिपाली मिश्रा, मिरा भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणूकीसाठी प्रचाराचा तोफा संध्याकाळी 5.30 च्या सुमारास थंडावल्या आहेत. हा प्रचार संपल्यानंतर मिरा भाईंदरमध्ये मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. मिरा भाईंदरमध्ये पैसै वाटत असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती भाजपच्या श्वेता पाटील आणि रनवीर बाजपाई यांनी देताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन महिलेची चौकशी सूरू असून तिच्याकडचा मुद्देमालही जप्त करण्यात आला होत
advertisement
मिरा भाईंदरमधील पंकरपाडा परिसरात ही घटना घडली आहे. त्याचं झालं असं की श्वेता पाटील यांना त्यांच्या एका कार्यकर्त्याचा फोन आला होता. या कार्यकर्त्याला एका महिलेच्या वागणुक थोडी संशयास्पद वाटली त्यामुळे त्याने श्वेता पाटील यांना संबंधित घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर त्या आपल्या महिला आणि पुरूष कार्यकर्त्यासह घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यावेळी शिवसेनेचे काही पदाधिकारी घटनास्थळी पहरेदारी करत होते, मात्र भाजपच्या लोकांना ते पळून गेल्याचे श्वेता पाटील यांनी सांगितले.
त्यानंतर ज्वेलर्सच्या आत जाऊन पाहिले असता एक महिला होती. तिच्या हातात पैशांचे बड्डल होते. त्यानंतर श्वेता पाटील यांनी या घटनेची माहिती निवडणूक भरारी पथक आणि पोलिसांना दिली होती. शिवसेनेच्या उमेदवार रिया म्हात्रे यांच्याशी संबंधित एका महिलेकडून लिफाफ्यांद्वारे पैसे दिले जात असल्याचा आरोप श्वेता पाटील यांनी होता.
या घटनेची माहिती मिळताच निवडणूक भरारी पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे. तसेच महिलेकडील मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. तसेच निवडणूक भरारी पथकाला या प्रकरणात जशी तक्रार मिळाली होती, त्यानुसार संबंधित महिलेची निवडणूक भरारी पथकाने चौकशी करून तिच्याकडूल मद्देमाल ताब्यात घेतला आहे,अशी माहिती काशिमीरा पोलिस स्टेशनचे सिनिअर पीआय राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे.
