मेट्रोसाठी एमएमआरडीएचा मोठा प्लॅन
सध्या सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी एमएमआरडीचा 48,072 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर झाला आहे. यातील तब्बल 87 टक्के निधी विविध पायाभूत प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे 2017-18 नंतर प्रथमच 17 लाख रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात प्राधिकरणाला यश आले आहे.
महामुंबई परिसरात सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी 42,026.14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 13,836.77 कोटी रुपये मेट्रो प्रकल्पांसाठी देण्यात आले आहेत. मुंबईतील मेट्रोचे जाळे शहराबरोबरच उपनगर आणि नव्या विकास क्षेत्रांपर्यंत विस्तारले जात आहे.
advertisement
कोणत्या मेट्रोचा मार्गाचा समावेश?
या निधीत वडाळा-कासारवडवली, स्वामी समर्थ नगर-कांजूरमार्ग, ठाणे-भिवंडी-कल्याण आणि दहिसर-मिरा भाईंदर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गांचा समावेश आहे. तसेच तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव्या विकास क्षेत्रासाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि आसपासच्या शहरांतील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
