TRENDING:

MNS Gudi Padwa: मनसेचा गुढीपाडवा मेळावा, दादरमध्ये रस्ते वाहतुकीत मोठे बदल

Last Updated:

दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेचा गुढीपाडवा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. त्यामुळे दादरमधील अनेक रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे पर्यायी वाहतूकीचा पर्याय दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
MNS Padwa Melava News: दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गुढीपाडवा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीनंतर पहिल्यांदाच मनसेचा मेळावा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्यामध्ये काय बोलणार? याकडे संपूर्ण मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुरूवार, 19 मार्च रोजी दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्क येथे ‘पाडवा मेळावा’ आहे. त्यानिमित्त आता मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूकीमध्ये बदल केले आहेत. गुरूवार, 19 मार्चला किती वेळासाठी, कोणकोणते रस्ते बंद असणार आहेत, एका क्लिकवर जाणून घेऊया...
News18
News18
advertisement

मनसेचा गुढीपाडवा मेळावा म्हटल्यावर मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक शिवाजी पार्कामध्ये दाखल होतात. फक्त मुंबई किंवा उपनगरांतूनच नाहीत तर, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक येत असतात. त्यामुळे उद्या गुरूवार, 19 मार्च रोजी दुपारी 01 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाहतूकीत बदल केला जाणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व दुतगती महामार्गावर मोठ्या संख्येने वाहने येणार असल्याने विशेषत: कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन व्यवस्थापनासाठी मुंबई वाहतूक विभागाने नो पार्किंग एरिया, वाहतूक वळविण्याचे पर्यायी मार्ग आणि मेळाव्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सूचना दिलेल्या आहे. नागरिकांची, वाहन चालकांना होणारा अडथळा आणि गैरसोय टाळण्यासाठी वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.

advertisement

नो-पार्किंग एरिया

एस.व्ही.एस. रोड (सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँक जंक्शन)

केळुस्कर रोड (उत्तर व दक्षिण), दादर

एम.बी. राऊत मार्ग

पांडुरंग नाईक मार्ग (रोड क्र. ५)

दादासाहेब रेगे मार्ग

लेफ्ट. दिलीप गुप्ते मार्ग (शिवाजी पार्क गेट क्र. ४ ते शितळादेवी मंदिर)

एन.सी. केळकर मार्ग (गडकरी चौक ते हनुमान मंदिर)

वाहतूक वळविण्याचे पर्यायी मार्ग

advertisement

एस.व्ही.एस. रोडसाठी- एस.के. बोले रोड, आगर बाजार, पोर्तुगीज चर्च, गोखले रोड, एल.जे. रोड मार्गे वळण

राजा बडे चौकमार्गे- एल.जे. रोड, गोखले रोड, स्टीलमन जंक्शन, एस.व्ही.एस. रोड

पांडुरंग नाईक रोड जंक्शनहून दक्षिणेकडे- राजा बडे जंक्शन, एल.जे. रोड

गडकरी चौक ते केळुस्कर रोड- एम.बी. राऊत मार्ग वापरावा

मेळाव्यासाठी येणाऱ्या मनसैनिकांसाठी सूचना

पश्चिम/ उत्तर उपनगरातून येणारे

advertisement

सेनापती बापट मार्ग (माटुंगा रेल्वे स्थानक ते रुपारेल कॉलेज) येथे उतरण्याची सोय

पार्किंग : महिम रेती बंदर, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर, कामगार मैदान, कोहिनूर पीपीएल

पूर्व उपनगर/ठाणे/नवी मुंबईहून

दादर टी.टी. सर्कल येथे उतरण्याची सोय

पार्किंग : फाईव्ह गार्डन (माटुंगा), आर.ए.के. ४ रोड

दक्षिण मुंबईहून

वीर सावरकर रोडमार्गे येणाऱ्यांसाठी रवींद्र नाट्य मंदिर येथे उतरण्याची सोय

advertisement

बी.ए. रोडमार्गे येणाऱ्यांसाठी दादर टी.टी. येथे उतरणे

पार्किंग : इंडिया बुल्स पीपीएल, आप्पासाहेब मराठे मार्ग

पार्किंग स्थळे

सेनापती बापट मार्ग (महिम/दादर)

कामगार स्टेडियम

इंडिया बुल्स फायनान्स सेंटर (एल्फिन्स्टन)

कोहिनूर पीपीएल (शिवाजी पार्क)

आप्पासाहेब मराठे मार्ग

फाईव्ह गार्डन (माटुंगा)

महिम रेती बंदर

आर.ए.के. ४ रोड

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
MNS Gudi Padwa: मनसेचा गुढीपाडवा मेळावा, दादरमध्ये रस्ते वाहतुकीत मोठे बदल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल