नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपकडं दुसरा कोणताच मुद्दा राहिलेला नाही. गेल्या दहा वर्षांत जेवढा भ्रष्टाचार झाला तेवढा तर ब्रिटिशांनी देखील त्यांच्या काळात केला नसेल, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, काल गुजरात मंत्रालयाचं एक प्रकरण बाहेर आलं आहे. हा 3700 कोटींचा घोटाळा आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. केंद्राच्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी चांद्रयान तीनवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ठिकाणी चांद्रयानाने तिरंगा फडकवला त्या जागेला वैज्ञानिक विक्रम साराभाई यांचं नाव दिलं पाहेज. हे सर्व पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई या दोन महान लोकांनी जे काम केलं आहे, त्यामुळेच आपलं चांद्रयान चंद्रावर पोहोचू शकलं. तुम्ही वैज्ञानिकांना विसरता आणि प्रत्येक ठिकाणी हिंदुत्व घेऊन येता, परंतु काही गोष्टी असतात त्या विज्ञानाशी जोडलेल्या असतात हे वीर सावरकरांचे म्हणणे देखील आहे. त्यामुळे विज्ञानावर कुठल्या धर्माचे अतिक्रमण योग्य नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे.