एसटीने प्रवास करण्याआधी थांबा
एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांपासून तिकीट दरात कोणताही बदल केलेला नव्हता. मात्र वाढता खर्च आणि आर्थिक ताण लक्षात घेता ही भाडेवाढ करणे आवश्यक असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. डिझेलच्या किमतीत सातत्याने झालेली वाढ हे भाडेवाढीमागील प्रमुख कारण आहे. इंधन खर्चामुळे महामंडळाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत होता.
advertisement
याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन, महागाई भत्ता आणि वेतन सुधारणांमुळे खर्च वाढला आहे. बसची नियमित देखभाल, टायर, सुटे भाग आणि इतर तांत्रिक साहित्याच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या सर्व कारणांमुळे महामंडळाचा खर्च वाढत गेला.
कसे असतील नवे दर?
नवीन दरवाढीमुळे साध्या लालपरी बसपासून ते वातानुकूलित प्रीमियम बसपर्यंत सर्वच सेवा महागल्या आहेत. साध्या बससाठी प्रति 6 किमी टप्प्यासाठी सुमारे 10 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. शिवशाही एसी बससाठी हा वाढीव दर सुमारे 16 रुपये प्रति 6 किमी आहे. पुणे-मुंबईसारख्या प्रमुख मार्गांवरील शिवनेरी बसचे भाडेही वाढले आहे. तसेच लांब पल्ल्याच्या शिवशाही स्लीपर बसच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.
'या' प्रवशांना मिळणार सवलत
भाडेवाढ झाली असली तरी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे सामाजिक सवलती कायम ठेवण्यात आल्या आहेत. महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना मिळणारी 50 टक्के तिकीट सवलत पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि 65 ते 75 वयोगटातील नागरिकांना मिळणारी सवलतही कायम राहणार आहे.
