मुंबई : अहमदाबादला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल स्थानकातून ही एक्स्प्रेस आता 10 मिनिटं आधीच सुटेल. येत्या 24 ऑगस्टपासून हे लागू होईल. नेमका कोणत्या एक्स्प्रेसबाबत हा बदल करण्यात आलाय, सविस्तरपणे जाणून घेऊया.
22961 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद या वंदे भारत एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात येणार आहे. नव्या वेळेनुसार ही गाडी दुपारी 3.55 ऐवजी 3.45 वाजता सुटेल. त्यामुळे प्रवाशांनी आधीपेक्षा लवकर स्थानकावर पोहोचणं अपेक्षित आहे. काही महत्त्वाच्या कामकाजासाठी हा बदल करण्यात आल्याचं पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रलहून निघाल्यानंतर ही वंदे भारत एक्स्प्रेस बोरिवली स्थानकात 10 मिनिटं लवकर म्हणजेच दुपारी 4.20 ऐवजी 4.10 वाजता पोहोचेल. इथं 3 मिनिटांचा थांबा असेल. मग दुपारी 4.13 वाजता बोरिवली स्थानक सोडल्यानंतर ही एक्स्प्रेस 5.40 वाजता वापीला पोहोचेल. त्यानंतर संध्याकाळी 6.38 वाजता या एक्स्प्रेसचा थांबा सुरतला असेल. मग वडोदराला 8.11 वाजता पोहोचेल आणि अहमदाबाद स्थानकात सध्याच्या नियोजित आगमन वेळेपेक्षा 10 मिनिटं आधी म्हणजे 9.15 वाजता दाखल होईल.
स्टेशन गाडी पोहोचण्याची वेळ गाडी निघण्याची वेळ
मुंबई सेंट्रल 3.45 वाजता
बोरिवली 4.10 वाजता 4.13 वाजता
वापी 5.40 वाजता 5.42 वाजता
सुरत 6.38 वाजता 6.43 वाजता
वडोदरा 8.11 वाजता 8.14 वाजता
अहमदाबाद 9.15 वाजता