आठवड्यातून दोन दिवस धावणार ट्रेन
वांद्रे टर्मिनल ते मडगाव जंक्शन ही गाडी वांद्रे येथून बुधवार आणि शुक्रवारी सुटेल तर मडगाव येथून मंगळवार आणि गुरुवारी सुटेल. मडगाव जंक्शन वांद्रे टर्मिनल (10116) आणि वांद्रे टर्मिनल मडगाव जंक्शन (10115) या क्रमांकाने या नवीन गाड्या धावणार आहेत. ही गाडी वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, बीड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड आणि करमाळी या स्थानकावर थांबेल. तर खेडला देखील थांबा दिला जावा अशी मागणी करण्यात येत आहे.
advertisement
कोकणाला रेल्वेचं मोठ गिफ्ट, आजपासून मडगाव- बांद्रा टर्मिनस- मडगाव एक्स्प्रेस सुरू
काय असणार वेळापत्रक?
वांद्रे ते मडगांव: वांद्रे टर्मिनसहून येथून ही ट्रेन सकाळी 6.50 मिनिटांनी सुटेल. बोरिवलीला 7.23 वाजता, वसई रोडला 7.50 वाजता, भिवंडी रोडला 8.50 वाजता, पनवेलला 9.55 वाजता, रोहा 11.15 वाजता, वीर 12.00 वाजता, चिपळूणला 13.25, रत्नागिरीला 15.35, कणकवलीत 18.00, सिंधुदुर्ग 18.20, सावंतवाडी रोड 19.00 वाजता थिविमला 20.00, करमाळीला 20.30 तर मडगावला 22.00 वाजता पोहोचेल. रोहा आणि रत्नागिरीत ट्रेन 5 मिनिट तर वसई रोडला 25 मिनिटं थांबेल.
मडगावं ते वांद्रे: मडगाववरुन वांद्रे टर्मिनससाठी निघणारी एक्स्प्रेस 7.40 वाजता सुटेल. करमाळीत 8.10 वाजता, थिविमला 8.32, सावंतवाडी रोड 9.00, सिंधुदुर्ग 9.36, कणकवली 9.50, रत्नागिरी 13.30 , चिपळूण 15.20, वीर 17.30 , रोहा 18.45, पनवेल 20.10, भिवंडी रोड 21.05, वसई रोड 22.05, बोरिवली 22.43 आणि वांद्रे टर्मिनसला 23.40 ला पोहोचेल, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आलीये.
खूशखबर! यंदा मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार; काय आहे कारण?
काय असणार तिकीट दर?
वांद्रे टर्मिनस ते मडगाव या प्रवासासाठी स्लीपर डब्याचं तिकीट 420 रुपये असणार आहे. तर एसी थ्री टियर इकोनॉमी 1050 रुपये, एसी थ्री टियर 1135, एसी 2 टियर 1625 रुपये इतका तिकीट दर आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या चाकरमान्यांकडून ट्रेन सुरू करण्याबाबत मागणी होत होती. त्यानुसार रेल्वे बोर्डानं पश्चिम रेल्वेला वांद्रे-मडगांव एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी दिलीये.






