मुंबई महापालिकेतील कामगार संघटनांनी यंदा दिवाळीत 50 हजार रुपयांचा बोनस मिळावा अशी मागणी केली होती. तशी बोलणी देखील कामगार संघटना आणि प्रशासनात सुरू होती. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची बोनसबाबत सकारात्मक भूमिका होती. त्यानुसार गतवर्षीपेक्षा 2 हजार रुपयांची वाढ करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 31 हजार रुपये बोनस जाहीर केला आहे.
advertisement
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, बोनस जाहीर, कुणाला किती मिळणार पैसे?
अधिकारी ते कर्मचारी कुणाला किती बोनस?
अधिकारी आणि कर्मचारी: 31,000 रुपये
अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी : 31,000 रुपये
महापालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक : 31,000 रुपये
माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित / विनाअनुदानित) : 31,000 रुपये
माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित / विनाअनुदानित) : 31,000 रुपये
अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित / विनाअनुदानित) : 31,000 रुपये
अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित) : 31,000 रुपये
सामाजिक आरोग्य स्वयंसेविका भाऊबीज भेट : 14,000 रुपये
बालवाडी शिक्षिका / मदतनीस भाऊबीज भेट : 5,000 रुपये