नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, बोनस जाहीर, कुणाला किती मिळणार पैसे?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Diwali Bonus: दिवाळीआधीच नवी मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांना गोड बातमी दिली आहे. आतापर्यंतचा सर्वाधिक बोनस जाहीर केला आहे.
नवी मुंबई: नवी मुंबईच्या महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांना 34 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना 28 हजार 500 तर आशा वर्कर यांना 18 हजार 500 रुपये अनुदान मंजूर करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी हे सानुग्रह अनुदान मंजूर केले.
नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांना 34500 रुपये इतके सानुग्रह अनुदान दिले जाईल. यामध्ये गतवर्षीपेक्षा 1500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर ठोक मानधनावर आणि किमान वेतनावर तात्पुरत्या स्वरूपातील करार पद्धतीवर वेतनश्रेणीत कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक आणि मदतनीस यांना 28 हजार 500 रुपये इतकी अनुदानाची रक्कम दिली जाईल.
advertisement
राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर नेमलेल्या आणि शासनाकडून मानधन प्राप्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही करार पद्धतीवरील कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 हजार 500 रुपये आणि आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना 18500 सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
यंदा आरोग्य विभागातील कोविड, नॉन कोविड अंतर्गत कार्यरत अधिकारी – कर्मचारी आणि शिक्षण विभागातील घड्याळी तासिका प्राथमिक व माध्यमिक शिक्षक कर्मचारी आणि अंशकालीन निदेशक (कला, क्रीडा व कार्यानुभव) यांना देखील 18 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
view commentsLocation :
Navi Mumbai Panvel Raigarh,Raigad,Maharashtra
First Published :
October 16, 2025 7:09 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, बोनस जाहीर, कुणाला किती मिळणार पैसे?