TRENDING:

Mumbai News : ज्या चाकूने भाज्या कापायचा,त्यानेच शेजाऱ्याचा काटा काढला, मुंबई हादरली!

Last Updated:

मुंबईच्या उपनगरातील दहिसर पश्चिमेत एका तरूणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे.भरत आढाव (36 वय)असे या मृत तरूणाचे नाव आहे.या घटनेने गणपत पाटील नगर परिसरात खळबळ माजली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mumbai Crime News : विजय वंजारा, प्रतिनिधी,मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या उपनगरातील दहिसर पश्चिमेत एका तरूणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे.भरत आढाव (36 वय)असे या मृत तरूणाचे नाव आहे.या घटनेने तरुणाची आरोपीची हत्या करणारा हा त्याचाच शेजारी निघाला आहे. आणि त्याने घरात जेवणासाठी वापरात असले्ल्या चाकुने त्याची हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसानी तपासाची चक्रे फिरवत तासाभरात आरोपीला गजाआड केले होते. या घटनेने आढाव कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,मुंबईतील दहिसर पश्चिम येथील गणपत पाटील नगर परिसरात मृत भरत आढाव आणि आरोपी शेजारी शेजारी राहत होते.आज अचानक किरकोळ वादातून भरत आढावचीय त्याच्या शेजाऱ्याने चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. खरं तर दहिसर पश्चिमेतील गणपत पाटील नगर, गल्ली क्रमांक 5 च्या परिसरात आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातूनच आरोपीने भरत आढाव यांच्यावर चाकूने वारे केले होते. हा हल्ला इतका भयानक होता की मृत तरूण रक्तबंबाळ झाला होता.त्यानंतर काहीच मिनिटांनी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.

advertisement

दरम्यान या घटनेत मृत भरत जाधव याची आई छाया भरत यांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये होळीच्या दिवशी वाद झाला होता. घराबाहेर बाईक उभी करण्यावरून वाद झाला होता. त्यावेळेस माझ्या मुलाने तु बाईक मला दाराजवळ लावून दे,दाराजवळ बाईक लावली की तु पाहिजे तर मी घरात जाईन,तु बाजूला हो, पण तो बाजूला झाला नाही आणि त्याने भांडण करायला सूरूवात केली हौती.माझ्या मुलावर मारहाण केल्याचा आरोप केला होता. पण माझ्या पोराने काहीच केले नव्हेत, असे मृत भरतच्या आईने सांगितले होते.

advertisement

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एम.एच.बी. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच या घटनेनंतर तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपी तरूणाला तासाभरात अटक केली होती. राजा यादव असे या आरोपीचे नाव आहे. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणामागील नेमके कारण, शत्रुत्व तसेच इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास एम.एच.बी. पोलीस करत आहेत

advertisement

दरम्यान, या हत्येमुळे गणपत पाटील नगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वीही या परिसरात तिहेरी हत्याकांड घडल्याने स्थानिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तोट्यात जाणाऱ्या शेतीला आधुनिक पद्धतीनं पिकवलं, 60 लाखांचा झाला नफा, अनुराग यांनी कसा केला प्रयोग?
सर्व पहा

या प्रकरणी एम.एच.बी पोलिसांनी आरोपीला अवघ्या तासाभरात अटक केली आहे

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : ज्या चाकूने भाज्या कापायचा,त्यानेच शेजाऱ्याचा काटा काढला, मुंबई हादरली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल