मुंबईसह उपनगर आणि जवळच्या शहरांत गणेशोत्सवाची धूम आहे. या ठिकाणी मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो. 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने मोठ्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल करण्याची मागणी आमदार अमीन पटेल, रईस शेख आणि नसीम खान यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार गुरुवारी राज्य सरकारने या निर्णयात बदल करून 8 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केली.
advertisement
Weather Alert: कोकणात पावसाचं तुफान; ठाणे, नवी मुंबईला झोडपणार, या जिल्ह्यांत हायअलर्ट
मुंबईत ईदचा जुलूस 8 सप्टेंबर रोजी
शनिवारी 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण आहे. राज्यात बंधुता आणि ऐक्य कायम राहावे यासाठी मुस्लिम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम 8 सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दिवशी शासकीय सुट्टी राहील.
सोमवारी काय बंद राहणार?
राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार मुंबई शहर आणि उपनगरांतील शासकीय कार्यालये 5 सप्टेंबर रोजी नियमित सुरू राहतील. तसेच शुक्रवारी मुंबईतील बँका, शाळा, महाविद्यालये आणि केंद्र सरकारची कार्यालये देखील सुरू राहतील. त्याऐवजी सोमवारी बँका व अन्य शासकीय कार्यालये बंद राहतील.
मुंबई वगळता राज्यात शुक्रवारीच सुट्टी
मुंबईच्या जवळ असणाऱ्या ठाणे, नवी मुंबईसह इतर शहरांत शुक्रवारीच ईदची सुट्टी राहील. त्यामुळे मुंबई वगळता संपूर्ण राज्यात बँका आणि शासकीय कार्यालये शुक्रवारी बंद राहणार असून सोमवारी नियमित सुरू राहतील.