मुंबई महानगरपालिकेतील 227 जागांसाठी युतीचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आज शिवसेना भवनात या सर्व उमेदवारांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे संयुक्तपणे उमेदवारांना मार्गदर्शन केले. तसेच प्रचाराची दिशा, स्थानिक मुद्दे, तसेच समन्वय साधून लढा कसा द्यायचा, यावर भर दिला. आगामी प्रचाराच्या रणनितीबाबतही मार्गदर्शन केले आहे.
advertisement
लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर नवा प्लान
राज्यातील तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी विधानसभा निवडणुकी दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली होती. त्याचा महायुती सरकारला मोठा फायदा झाला आहे. . त्यानंतर आता या योजनेच्या धर्तीवर ठाकरे बंधूंनी काम केल्याचे समोर आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदारांना आकर्षीत करण्यासाठी ठाकरेंना महामेगाप्लान केला आहे.
काय आहे ठाकरेंचा महामेगाप्लान?
- घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करणार आणि नोंदणींकृत महिलांनी दर महिन्याला १५००चा स्वाभिमान निधी
- कोळ, मच्छीमार महिलांची नोंदणी, अर्थसाहाय्य आणि नव्या परवान्याची तरतूद ज्यात समुदायाअंतर्गत परवान्याच्या हस्तांतराची सोय
- कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त १० रुपयात नाष्टा आणि दुपारचं जीवन देणारी मासाहे किचन्स
- मुंबईतील महिलांच्या मुलांसाठी उत्कृष्ट दर्जाची पाळणघरं उभी केली जाणार आहे
- मुंबईतील प्रमुख रस्त्यावर दर दोन किमीवर महिलांसाठी उत्तम स्वच्छता असलेली स्वच्छतागृह उभारली जाणार आहे
दोन्ही पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबीय आणि मित्रपक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
