सध्याच्या काळात डेकोरेशनच्या थीमनुसार गणेशमूर्ती घडवण्याकडे कल वाढत आहे. आता बाप्पांच्या आगमनाला दीड महिन्यांच्या काळ राहिला आहे. शाडू मूर्ती बनवण्यासाठी आठ ते दहा महिने आधीच ऑर्डर घेतलेल्या असतात. त्यामुळे गणेशचित्र शाळेत मुर्तिकांरांची दिवसरात्र लगबग सुरू आहे. ग्राहक एखादे चित्र घेऊन येतात आणि थीम सांगून जातात. त्यानुसार आम्ही बाप्पांची मूर्ती बनवत असतो. चित्रातील डिटेल्सवरूनच मूर्तीचे मानधन ठरते, असे एका मूर्तिकाराने सांगितले.
advertisement
MHADA Lottery: बाप्पा पावणार! घराचं स्वप्न साकार होणार, ठाणे ते ओरोस म्हाडाच्या 5285 घरांसाठी सोडत
कारागीर मिळेना, मूर्ती महागल्या
सध्याच्या काळात शाडूच्या मूर्तींची मागणी वाढली आहे. मात्र हा व्यवसाय ठराविक सिझनपुरता मर्यादित आहे. त्यामुळे तरुण पिढीकडे या व्यवसायाकडे लवकर वळत नाही. त्यामुळे मूर्ती बनवण्यासाठी कामगार मिळणे कठीण झाले आहे. पारंपरिक शाडू मूर्ती बनवण्यासाठी साधारण एक दिवस लागतो. तर थीमनुसार मूर्ती असेल तर 5 ते 6 दिवस लागतात. मूर्ती भाविकांच्या घरी आणि तिथून विसर्जन स्थळी सुखरुप जावी म्हणून योग्य ती काळजी घ्यावी लागते, असेही मुंबईतील एका मूर्तिकाराने सांगितले.