मुंबई-गोवा महामार्गाचा विषय काढल्यानंतर नितीन गडकरी हसले आणि पुढे म्हणाले की, “ मुंबई गोवा महामार्गासाठी अनेक अडचणी आल्या. मात्र, यातून मार्ग काढत हे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. हा रस्ता बराच काळ रेंगाळला. दिल्ली जयपूर आणि मुंबई – गोवा आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट्स आहेत, अशी कबुलीच गडकरी यांनी दिली.
advertisement
Pune-Bangalore Highway: आता सुस्साट सुटायचं! पुण्याहून बंगळुरु फक्त 5 तासांत, कसं शक्य होणार?
3 एकर जमीन अन्..
मुंबई-गोवा महामार्गाबाबत बोलताना गडकरी यांनी कोकणातील अडचणी सांगितल्या. ते म्हणाले की, “14 ते 15 जण 3 एकर शेतीचे मालक. त्यांच्यात भावा-भावांमध्ये भांडणं होती. कोर्ट केसेस झाल्या. त्या जमिनीचा मोबदला देता देता पुरेवाट लागली. पण आता समस्या सुटली आहे.”
टोलचे नवे धोरण
यावेळी बोलताना गडकरी यांनी 15 दिवसांत टोलचे नवे धोरण आणण्यात येणार असून या धोरणात वाहनचालकांची कोणतीही तक्रार नसेल, असे सांगितले. भविष्यात सॅटेलाईटच्या माध्यमातून टोलवसुली केली जाईल. त्यामुळे नागरिकांना टोलनाक्यांवर थांबावे लागणार नाही. तसेच लवकरच पुणे ते बंगळुरु महामार्गाचे काम पूर्ण होणार असून हे अंतर अवघ्या 5 तासांत पार करता येईल, असंही गडकरी यांनी सांगितलं.
दरम्यान, येत्या 2 वर्षांत भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे अमेरिकेपेक्षा चांगले होईल, असा आशावाद देखील यावेळी बोलताना गडकरी यांनी व्यक्त केला.