Pune-Bangalore Highway: आता सुस्साट सुटायचं! पुण्याहून बंगळुरु फक्त 5 तासांत, कसं शक्य होणार?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Pune-Bangalore Highway: पुण्याहून बंगळुरुला फक्त 5 तासांत जाता येणार आहे. नितीन गडकरी यांनी नव्या महामार्गाबाबत माहिती दिली.
मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत ते बंगळुरु आता सुस्साट प्रवास होणार आहे. अटल सेतूपासून पुण्याच्या रिंगरोडपर्यंत जाणारा नवा महामार्ग उभारला जात आहे. हा महामार्ग पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे पेक्षाही रुंदीने तिप्पट असेल. तर पुढे पुणे ते बंगळुरु नव्या महामार्ग उभारला जात आहे. त्यामुळे पुण्याहून बंगळुरुला 5 तासांत पोहोचता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीये.
मुंबईत दादरच्या अमर हिंद मंडळाने वसंत व्याख्यानमाला आयोजित केली होती. यामध्ये ‘महामार्ग विकासाचा’ या विषयावर बोलताना गडकरी यांनी आपले आगामी प्लॅन सांगितले. यामध्ये अटल सेतूवरून बंगळुरुपर्यंत महामार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून अटल सेतू ते पुण्याचा रिंगरोड आणि पुणे ते बंगळुरु नव्या महामार्गाचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
मुंबई-गोवा महामार्ग जूनपर्यंत सुरू होणार
मुंबई – गोवा महामार्गाच्या कामात अनेक अडचणी आल्या. हा महामार्ग आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट होता. परंतु, येत्या जूनअखेरपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी नवी डेडलाईन गडकरी यांनी दिलीये. तसेच येत्या 2 वर्षांत भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे अमेरिकेपेक्षा चांगले होईल, असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.
advertisement
टोलचे नवे धोरण
यावेळी बोलताना गडकरी यांनी 15 दिवसांत टोलचे नवे धोरण आणण्यात येणार आहे. या धोरणात वाहनचालकांची कोणतीही तक्रार नसेल. भविष्यात सॅटेलाईटच्या माध्यमातून टोलवसुली केली जाईल. त्यामुळे नागरिकांना टोलनाक्यांवर थांबावे लागणार नाही, असेही गडकरींनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 15, 2025 1:24 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune-Bangalore Highway: आता सुस्साट सुटायचं! पुण्याहून बंगळुरु फक्त 5 तासांत, कसं शक्य होणार?