मुंबईला दररोज सरासरी 3,950 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये मुंबईसह ठाणे आणि भिवंडीच्या काही भागांचाही समावेश आहे. एका महिन्याचा पाणीपुरवठा साधारणत 1 लाख 20 हजार दशलक्ष लिटर एवढा असतो. सध्या साठवलेला पाणीसाठा कोणतीही कपात न करता किमान 11 महिने पुरवठा करण्यास सक्षम आहे. त्यामुळे येत्या काळात पाणीटंचाईसारखी परिस्थिती उद्भवणार नाही, असा दिलासा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
advertisement
2024 च्या तुलनेत यंदा 23 हजार दशलक्ष लिटर जास्त पाणी साठवले गेले आहे. हा अतिरिक्त साठा आगामी महिन्यांत पावसाची अनिश्चितता असतानाही मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा करेल. विशेष म्हणजे तलावांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे हा साठा अधिक भरवशाचा ठरतो आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना आता पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता करण्याची गरज नाही. महापालिकेच्या पाणी अभियंत्यांनी स्पष्ट केले की, “ऑगस्ट 2026 पर्यंत कोणतीही पाणी कपात अथवा टंचाईची शक्यता नाही.” पावसाळ्याच्या अर्धवट सुरुवतीनंतरही झालेला समाधानकारक साठा हे जलव्यवस्थापनाचे यश मानले जात आहे.