याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन शाळांना आज सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या संभाव्य परिस्थितीचा विचार करून मुंबई विद्यापीठाने आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. आता या परीक्षा 23 ऑगस्ट 2025 रोजी सुधारीत वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. परीक्षा संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले की, संबंधित सर्व विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी नव्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी.
advertisement
कोणत्या विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
मास्टर ऑफ आर्ट (कम्युनिकेशन जर्नालिझम सत्र 3, पीआर सत्र 3, टेलेव्हिजन स्टडीज सत्र 3, इलेक्ट्रॉनिक मीडिया सत्र 3, फिल्म स्टडीज सत्र 3)
एमपीएड सत्र 2, बीपीएड सत्र 2
बीफार्म सत्र 1, एमफार्म सत्र 2
एमएड सत्र 2, एमकॉम (ईकॉमर्स) सत्र 4
एमए (CDOE), बीई (कम्प्युटर सायन्स अँड डिजाईन, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स) या परीक्षांचा समावेश आहे.
पावसाचा इशारा लक्षात घेता पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील सर्व वरिष्ठ अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांना आज (19 ऑगस्ट) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात परिपत्रक उच्चशिक्षण संचालक, पुणे यांनी जारी केले आहे.
मुंबईत रात्रभर मुसळधार
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र मुंबईजवळ असल्याने शहरात आणि उपनगरांत रात्रभर पाऊस कोसळला. आज दिवसभर पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. परळ, माटुंगा, दादर, सायन सह अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना कामावर जाण्यास त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले आहे.