घडलं काय?
तक्रारदार हे आपल्या कुटुंबासह साकिनाका परिसरात वास्तव्यास असून त्यांचे याच भागात स्वतःचे मेडिकल स्टोअर आहे. अब्दुल रहिम हा डॉक्टर त्यांच्या ओळखीचा होता. त्याने नवीन रुग्णालय सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. काही दिवसांनंतर त्याने अब्दुल रेहमान आणि तारीक शेख या दोन्ही डॉक्टरांशी तक्रारदाराची ओळख करून दिली.
advertisement
या तिन्ही डॉक्टरांनी रुग्णालय सुरू झाल्यानंतर तेथे मेडिकल स्टोअर भाड्याने देण्याचे आश्वासन दिले. यासाठी डिपॉझिट आणि फर्निचरच्या नावाखाली तक्रारदाराकडून एक कोटी एक लाख रुपये घेतले. एप्रिल महिन्यात रुग्णालय सुरू होईल असे सांगण्यात आले होते. मात्र डिसेंबर 2024 पर्यंत रुग्णालय सुरू झाले नाही.
याबाबत वारंवार विचारणा केली असता आरोपी डॉक्टर टाळाटाळ करू लागले. त्यामुळे संशय बळावल्याने तक्रारदाराने साकिनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे.
