मुंबईतील आणखी एका पुलाची दुरावस्था
राहिवाशांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रार केली पण अद्याप पूलाची दुरुस्ती किंवा नूतनीकरण केले गेलेले नाही. पुलाजवळ कचरा, माती आणि सिमेंटचे ढिगारे देखील जमले आहेत. माटुंगा पूर्वेकडील बाजूस वाळलेली पानं आणि तिथे वाढवेल्या झाडांमुळे पूल चालण्यासाठी अरुंद होतो. पावसाळ्यात पूल अधिक धोकादायक होतो कारण निसरडा होतो.
मुंबईतील महत्त्वाचा इंटरचेंज धोक्यात
advertisement
हा पूल माटुंगा पूर्व आणि पश्चिमाला जोडणारा महत्त्वाचा इंटरचेंज आहे. यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. रहिवाशांना सुरक्षित मार्गाची गरज आहे. नुकतेच पुलाचा मुद्दा समोर आल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांकडून अधिकृत उत्तर देण्यात आले आहे. पुलाची पाहणी केली जाईल आणि त्याचे मूल्यांकन करण्यासाठी पथक पाठवले जाईल. राहिवाशांनी विनंती केली आहे की पुल कमीत कमी चालण्यायोग्य केला जावा आणि योग्य देखभाल केली जावी. सुरक्षिततेसाठी त्वरित कारवाई आवश्यक आहे.
