मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ब्लॉक
ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 10.40 पासून दुपारी 3.40 पर्यंत हा ब्लॉक असेल. त्यामुळे या काळात सकाळी 9.34 ते दुपारी 3.03 दरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद / अर्धजलद लोकल ठाणे कल्याणदरम्यान चिया मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल कळवा, मुंडा आणि दिवा स्थानकावर थांबतील. तसेच सकाळी 10.28 ते दुपारी 3.40 दरम्यान कल्याण येथून सुटणाऱ्या जलद लोकल अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.
advertisement
Thane Metro : मेट्रो ट्रायल रनचा मुहूर्त ठरला, ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी
ट्रान्स हार्बर मार्ग
पनवेल ठाणे अप आणि डाऊन मार्गावर देखील रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. रविवारी सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 पर्यंत हा ब्लॉक असेल. या काळात पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल, तसेच सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 दरम्यान ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वाशीदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. ब्लॉक काळात ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठाणे- वाशी / नेरुळ दरम्यान सुरू राहील. तसेच पोर्ट मार्गावरील लोकल सेवा उपलब्ध राहील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
पनवेल-वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या काळात मेगाब्लॉक असेल. या काळात सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 दरम्यान पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल धावणार नाहीत. तसेच सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 दरम्यान सीएसएमटी येथून बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या लोकल देखील रद्द असतील.
पश्चिम रेल्वेवर ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या वसई विरार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 12.15 ते पहाटे 4.15 दरम्यान हा ब्लॉक असेल. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी मुंबईकरांना रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं लागेल.