TRENDING:

Western Railway: प्रवाशांसाठी मोठी बातमी! वर्षाच्या शेवटी पश्चिम रेल्वे रडवणार, एकाच दिवशी तब्बल 277 लोकल रद्द

Last Updated:

Western Railway Mega Block News: कांदिवली ते बोरिवली स्टेशनदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील कामांसाठी पश्चिम रेल्वेवर 26 आणि 27 डिसेंबर या दोन दिवसांत एकूण 277 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी पुढचे काही दिवस अडचणीचे असणार आहेत. कांदिवली ते बोरिवली स्टेशनदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील कामांसाठी पश्चिम रेल्वेने 30 दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकचा सर्वाधिक परिणाम 26 आणि 27 डिसेंबर रोजी होणार असून, या दोन दिवसांत एकूण 277 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Western Railway: प्रवाशांसाठी मोठी बातमी! वर्षाच्या शेवटी पश्चिम रेल्वे रडवणार, एकाच दिवशी तब्बल 277 लोकल रद्द
Western Railway: प्रवाशांसाठी मोठी बातमी! वर्षाच्या शेवटी पश्चिम रेल्वे रडवणार, एकाच दिवशी तब्बल 277 लोकल रद्द
advertisement

खरंतर, कांदिवली ते बोरिवली स्टेशनदरम्यानचा पश्चिम रेल्वेवरील हा मेगाब्लॉक 20 किंवा 21 डिसेंबर 2025 पासून सुरु झाला असून जो 18 जानेवारी 2026 पर्यंत चालणार आहे. शनिवार आणि रविवार या दोन्हीही दिवसांत या ब्लॉकच्या काळात 27 डिसेंबर (शनिवारी) पहाटे 4 ते रात्री 9 च्या दरम्यान तब्बल 277 लोकल ट्रेन रद्द होणार आहेत. याशिवाय 26 आणि 27 डिसेंबरच्या मध्यरात्री सुद्धा पश्चिम रेल्वेकडून अनेक लोकल ट्रेन्स रद्दच केल्या जाणार आहेत. सोबतच, काही मेल- एक्सप्रेसच्या आगमन आणि निर्गमनच्या वेळेतही बदल केला जाणार आहे.

advertisement

बोरीवली स्थानकार अप आणि डाऊन स्लो मार्गावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) पॅनलच्या कमिशनिंग कार्यासाठी 26 आणि 27 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजता सकाळी 7 वाजेपर्यंत मेजर नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेतला जाणार आहे. याशिवाय, 26 डिसेंबरच्या रात्री 11 वाजल्यापासून 28 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कांदिवली आणि दहिसरच्या दरम्यान डाऊन फास्ट मार्गिकेवर वेगावर नियंत्रण लागू होणार आहे. यामुळे काही लोकल ट्रेन रद्द रहातील, तर काही लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे.

advertisement

26 डिसेंबर 40 अप लोकल, 47 डाऊन लोकल, अशा एकूण 94 लोकलवर परिणाम होईल. 26- 27 डिसेंबर रात्री 22 अप लोकल, 18 डाऊन लोकल, एकूण 40 लोकलवर परिणाम होईल. तर, 27 डिसेंबर रोजी, 149 अप आणि डाऊन लोकलवर परिणाम होणार आहे, अशा एकूण 277 लोकलवर परिणाम होईल. पश्चिम रेल्वेच्या ब्लॉकच्या काळात, कांदिवली आणि बोरीवली स्थानकावर ट्रॅक स्लीविंग, अनेक क्रॉसओवर्सचे इन्सर्शन आणि रिमूव्हल, सिग्नलिंग तसेच ओव्हरहेड इक्विपमेंट संबंधित महत्वाची काम केली जातील. या तांत्रिक कामामुळे उपनगरीय, पॅसेंजर आणि मेल- एक्सप्रेस ट्रेनचे संचालन प्रभावित होणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krishi Market: शेतकरी मालामाल होणार, शेवगा बाजारात तेजी; आले, गुळाचे भाव काय?
सर्व पहा

मेगाब्लॉकच्या काळात नियमित प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. काही लोकल गाड्या फक्त गोरेगावपर्यंतच चालवल्या जाणार आहेत तसेच काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. याबरोबरच काही लोकल नियोजित वेळेपेक्षा उशिरा धावण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Western Railway: प्रवाशांसाठी मोठी बातमी! वर्षाच्या शेवटी पश्चिम रेल्वे रडवणार, एकाच दिवशी तब्बल 277 लोकल रद्द
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल