मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएटी-विद्याविहार अप आणि डाउन धिम्या मार्गावर 5 तास मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. तर पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर पोर्ट लाइन वगळून सकाळी 11:05 ते दुपारी 4:05 पर्यंत मेगाब्लॉक राहील.
मुंबईकरांचा अर्धा तास वाचणार, वाहतूक कोंडीतून होणार सुटका, आजपासून उड्डाणपूल सुरू
advertisement
मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे पनवेल येथून सकाळी 10:33 ते दुपारी 3:49 पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तसेच सीएसएटीवरून सकाळी 9:45 ते दुपारी 3:12 पर्यंत पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा देखील सुटणार नाहीत. ट्रान्स हार्बर लाइन मार्गावर केवळ ठाणे- वाशी/ नेरूळ स्थानकांदरम्यान सेवा उपलब्ध राहतील.
दरम्यान, ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- वाशीदरम्यान विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील. प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्याने या काळात विलेपार्ले स्थानकावर लोकल थांबणार नाहीत. तर जलद मार्गावर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे राम मंदिर येथेही गाड्या थांबणार नाहीत. हार्बर मार्गावरील विलेपार्ले आणि राममंदिर येथे सेवा उपलब्ध असतील.
पश्चिम रेल्वे पाच तास ब्लॉक
पश्चिम रेल्वेमार्गावर सांताक्रूझ आणि गोरेगाव स्टेशनदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन धिम्या मार्गावर हा पाच तासांचा जंबो ब्लॉक असेल. या काळात सांताक्रूझ आणि गोरेगाव स्टेशनदरम्यान सर्व धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवल्या जातील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.