TRENDING:

मुंबईकरांसाठी गुड न्यूज, मेट्रो 11 थेट वांद्रे टर्मिनसपर्यंत जाणार, नेमका प्लॅन काय? कधी पूर्ण होणार?

Last Updated:

Mumbai News: मेट्रो 11 मार्गिकेची एकूण लांबी अंदाजे 17.51 किमी असून त्यात 14 स्थानकांचा समावेश आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मेट्रो 11 (ग्रीन लाईन) प्रकल्पाला महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 5500 कोटी रुपयांचे जपानी अधिकृत विकास सहाय्य (ओडीए) कर्ज मिळणार असून यासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) आणि भारत सरकार यांच्यात करार झाला आहे. या निधीमुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे.
मुंबईकरांसाठी गुड न्यूज, मेट्रो 11 थेट वांद्रे टर्मिनसपर्यंत जाणार, नेमका प्लॅन काय? कधी पूर्ण होणार?
मुंबईकरांसाठी गुड न्यूज, मेट्रो 11 थेट वांद्रे टर्मिनसपर्यंत जाणार, नेमका प्लॅन काय? कधी पूर्ण होणार?
advertisement

मेट्रो 11 मार्गिकेची एकूण लांबी अंदाजे 17.51 किमी असून त्यात 14 स्थानकांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश स्थानके भूमिगत असतील. हा मार्ग आणिक डेपो (वडाळा) ते गेटवे ऑफ इंडिया असा मूळ प्रस्तावित असला तरी आता त्याचा विस्तार वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे धारावीमार्गे सुमारे 6.9 किमीचा हा विस्तार प्रस्तावित असून त्यात 5 नवीन स्थानकांचा समावेश असेल.

advertisement

मुंबई-पुणे प्रवास सुसाट, घाटातील कोंडी सुटणार, ‘मिसिंग लिंक’ची डेडलाईन ठरली, वाहतूक कधी सुरू?

वांद्रे टर्मिनसपर्यंतचा हा विस्तार प्रकल्पाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे शहरातील मध्य आणि पश्चिम उपनगरांमध्ये थेट दळणवळण सुधारेल. तसेच मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) आणि मुंबई पोर्ट वॉटरफ्रंट यांच्याशी जोडणी अधिक प्रभावी होणार आहे. परिणामी प्रवाशांसाठी जलद, सुलभ आणि पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध होईल.

advertisement

View More

या प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) करणार असून एकूण खर्च सुमारे 23,487 कोटी रुपये आहे. बांधकाम 2027 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा असून प्रकल्प ऑगस्ट 2032 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

वांद्रे टर्मिनसपर्यंतचा विस्तार हा केवळ वाहतुकीचा प्रश्न सोडवणारा नसून मुंबईच्या आर्थिक आणि नागरी विकासाला नवी चालना देणारा ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांसाठी गुड न्यूज, मेट्रो 11 थेट वांद्रे टर्मिनसपर्यंत जाणार, नेमका प्लॅन काय? कधी पूर्ण होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल