Uddhav Thackeray : ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदींचा आक्षेप, 'I want Protest...'; मातोश्रीवरील बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, नेमकं काय घडलं?
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:प्रशांत लीला रामदास
Last Updated:
Uddhav Thackeray : ठाकरे गटाच्या खासदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अंतर्गत वादाचा मोठा स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियांका चतुर्वेदी यांनी मध्येच हस्तक्षेप करत थेट नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई: 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू असताना काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांसोबत संवाद साधला. मात्र, ठाकरे गटाच्या खासदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अंतर्गत वादाचा मोठा स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियांका चतुर्वेदी यांनी मध्येच हस्तक्षेप करत थेट नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यसभेच्या जागेबाबत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संभाव्य वाद टाळण्यासाठी सावध भूमिका घेतली. या घडामोडींची माहिती उद्धव ठाकरे खासदारांना देत होते. या दरम्यान ठाकरेंच्या संबोधनामध्ये प्रियांका चतुर्वेदी यांनी आक्रमक पवित्रा घेत I want to protest. Why Sanjay Raut was giving a statement about Sharad Pawar? असा प्रश्न केला. चतुर्वेदी यांच्या या अनपेक्षित प्रश्नाने बैठकीतील वातावरण तापले.
advertisement
उद्धव म्हणाले, ''मी पक्षप्रमुख, संजय राऊत...''
चतुर्वेदी यांच्या आक्षेपावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत सुनावले की, "संजय राऊत बोलले म्हणून काय झाले? पक्षाचा प्रमुख मी आहे आणि अंतिम निर्णय मीच घेईन." असे स्पष्ट करत संजय राऊत यांची बाजू घेतली.
बैठक संपल्यानंतर एका खासदाऱ्याने प्रियंका चतुर्वेदी यांना ६ वर्षे संधी देऊन देखील काय उपयोग झाला असा सवाल देखील मराठवाड्यातील एका खासदाराने उद्धव ठाकरे यांना केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
आदित्य ठाकरे यांचे बैठकीत मौन...
खासदारांच्या बैठकीत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांना प्रकृती कारणास्तव काही मर्यादा आहेत. मग, आदित्य ठाकरे महाराष्ट्रात का फिरत नाहीत, अशी तक्रार संजय राऊत यांच्या घरी झाली तेव्हा खासदारांनी केली होती. त्यानंतर बैठकीत उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांनी खासदारांशी कुठलाही संवाद साधला नसल्याचे सांगण्यात येते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 10:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदींचा आक्षेप, 'I want Protest...'; मातोश्रीवरील बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, नेमकं काय घडलं?










