advertisement

"त्याला मारून... अन् मोकळं व्हावं", अशोक खरातसाठी भिडे गुरुजींनी सूचवली शिक्षा, नेमकं काय म्हणाले?

Last Updated:

Sambhaji bhide on Ashok Kharat: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. त्याच्याविरोधात आता नववा गुन्हा दाखल झाला आहे.

sambhaji bhide on ashok kharat news
sambhaji bhide on ashok kharat news
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. त्याच्याविरोधात आता नववा गुन्हा दाखल झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीनं त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी खरात याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. आरोपी खरातचे अनेक महिला आणि तरुणींसोबतचे व्हिडीओ आधीच व्हायरल झाले आहेत. आता एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर खरातने अशाप्रकारे अत्याचार केल्याचं समोर आल्याने त्याच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अशोक खरात याच्यासाठी तालिबानी शिक्षा सूचवली आहे. अशोक खरातला मारून टाकावं आणि मोकळं व्हावं, असा सल्ला संभाजी भिडे यांनी दिला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अशोक खरातबाबत विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
advertisement
संभाजी भिडे यांची ही प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल झाली असून यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी संभाजी भिडेंच्या सल्ल्याचं समर्थन केलं आहे. तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. सध्या अशोक खरातची नवनवीन प्रकरण समोर येत असल्याने सामान्य लोकांमधून देखील अशोक खरातला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. बुधवारी रात्री दाखल झालेल्या गुन्ह्यात अहिल्यानगर येथील तरुणाने अशोक खरातवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
advertisement
[video width="816" height="464" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/sambhaji-bhide-on-ashok-kharat-news-2026-03-d5404d70843ef99e79545c233051b3fb.mp4"][/video]

ताज्या प्रकरणात अशोक खरातवर नक्की आरोप काय?

पीडित अल्पवयीन मुलगी मुळची अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी ती अशोक खरातच्या संपर्कात आली होती. आरोपी अशोक खरात याने "माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी शंकराचा अवतार आहे" असं सांगत मुलीला आपल्या जाळ्यात ओढळलं होतं. शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी तन-मन-शांतीसाठी विशिष्ट पूजा करावी लागेल, असं खरातने मुलीला सांगितलं होतं.
advertisement
मुलीचा विश्वास संपादन केल्यानंतर अशोक खरातने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबतची तक्रार स्वत: अल्पवयीन मुलीनं सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. बुधवारी रात्री उशिरा पीडितेनं ही तक्रार दिली. एका अल्पवयीन मुलीनं आता समोर येऊन अशोक खरातचा पर्दाफाश केल्याने खळबळ उडाली आहे. त्याने अशाप्रकारे इतरही अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत अघोरी कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
"त्याला मारून... अन् मोकळं व्हावं", अशोक खरातसाठी भिडे गुरुजींनी सूचवली शिक्षा, नेमकं काय म्हणाले?
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement