देवींच्या साडेतीन शक्तिपीठांचे घ्या दर्शन, दादरमधील मंडळाने साकारला अनोखा देखावा
अलीकडेच, एमएमआरडीएने अनिश्चित काळासाठी चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकादरम्यान मोनोरेल मार्गिकेवरील सेवा बंद करण्यात आली होती. ही मोनो सेवा बंद करण्यात आल्यानंतर एमएमआरडीएने नवीन आठ मोनोरेल गाड्यांच्या चाचण्यांना शनिवारपासून अखेर सुरुवात केली आहे. यासोबतच जुन्या पाच मोनो रेल्वेलाही अत्याधुनिक करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काळात अत्याधुनिक मोनोरेल प्रकल्पाद्वारे प्रवाशांना सुरक्षित सेवा पुरवली जाईल, असा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे. तब्बल 580 कोटी रूपये खर्च करून आत्याधुनिक मोनो रेल्वे खरेदी केल्याने जुन्या यंत्रणेशी त्याची एकीकरण होत नव्हती.
advertisement
मराठा साम्राज्याच्या काळात पुण्यात बांधलं हे मंदिर, दुसरं आहे पेशवेकालीन!
या पार्श्वभूमीवर चेंबूर- वडाळा- सात रस्ता अशी धावणारी मोनोरेल सेवा 20 सप्टेंबरपासून स्थगित करण्यात आली आहे. या काळात नवीन गाड्यांच्या आधुनिकीकरणासह मार्गिकेसोबत एकरूप केले जाणार आहे. त्याचवेळी जुन्या मोनोरेल्वेच्या दुरूस्तीचे कामे एमएमआरडीएने प्राधान्याने हाती घेतले आहेत. मोनोरेल्वेच्या तेल पाण्यासाठी लागणार्या वेगवेगळ्या प्रकारच्या सामग्री खरेदीची निविदा काढण्यात आली आहे. यामध्ये सहा प्रकारचे वेगवेगळे 32 ग्रीस वंगणासाठी खरेदी केले जाणार आहे. तर, रेल्वेच्या इंजिनांला गती मिळण्यासाठी दहा प्रकारचे 3580 लिटर लुब्रिकंट खरेदी केले जाणार आहे.
पोलिओने पाय रोखले, पण स्वप्नांना नाही; संजयची मूर्ती बनवणारी मेहनत बनली प्रेरणा
सतत बंद पडणाऱ्या या मोनोला एमएमआरडीएकडून दुरूस्त केले जाणार आहे. अद्याप तरीही चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकादरम्यानची मोनो रेल केव्हापर्यंत सुरू होणार याची माहिती मिळालेली नाही. मोनोरेलचे इंजिन थंड ठेवणारे दोन हजार लिटर 'कूलंट'ही खरेदी केले जाणार आहे. गाडी बंद पडल्यानंतर बॅटरी बॅकअपही अल्पकाळ टिकत असल्याचे निरिक्षणातून स्पष्ट झाले आहे. यामुळेच गाड्यांच्या बॅटऱ्या सक्षम करण्यासाठी 1 हजार लिटर डिस्टील्ड वॉटर (रासायनिक पाणी) प्राधिकरण खरेदी करणार आहे. ही मार्गिका एमएमआरडीएच्या महामुंबई मेट्रो ऑपरेशन कंपनी लिमिटेडकडून (एमचीओसीडब्ल्यू) चालविली जाते. याच कंपनीअंतर्गत ही खरेदी होणार असून संबंधित कंत्राटदाराला ही सामग्री पुरवायची आहे.